​पत्रकार नोंदणी 

साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता या तीन माध्यमांतून देश विदेशातील १२ कोटी मराठी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाने जोडण्याचे स्वप्न उराशी बाळगून विश्व मराठी फाऊंडेशन विश्व मराठी परिषद या ना नफा ना तोटा संस्थेद्वारे कार्यरत आहे. छ. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सक्षम, संपन्न आणि समृद्ध मराठी बांधव हे ध्येय बाळगून आम्ही वाटचाल करीत आहोत. मराठी माणसाच्या सशक्तीकरणासाठी विविध प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असून उपयुक्त माहिती आणि संदेशांची देवाणघेवाण करीत आहोत. विविध उपक्रमांद्वारे जगभरातील ३६ देशांमधून, अमेरिकेतील २१ हून अधिक राज्यातून, भारतातील १२ राज्यातून आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातून विश्व मराठी परिषदेचे कार्य सुरू आहे. 

आपण पत्रकार म्हणून फार महत्त्वाचे आणि उपयुक्त कार्य करीत आहात. जगभरातील विविध देशातील मराठी विश्वात घडणाऱ्या घडामोडी, उपक्रम, संकल्पना, माहिती आपल्या पर्यंत थेट पोहोचण्यासाठी कृपया पुढील लिंकवर जाऊन आपली नोंदणी करा. सक्षम आणि सशक्त मराठीसाठी आपले योगदान अत्यंत उपयुक्त ठरेल.   तसेच आपले मार्गदर्शन आणि सूचना याद्वारे मराठी माणसाच्या सर्वांगिण विकासासाठी मोठे सहाय्य होईल असा विश्वास वाटतो.    

पत्रकार नोंदणी अर्ज 

धन्यवाद. विश्व मराठी परिषदेच्या पत्रकार यादीमध्ये आपली नोंदणी पूर्ण झाली आहे.