परिचय
प्रा. क्षितिज रमेश पाटुकले
संस्थापक - अध्यक्ष (पुणे, महाराष्ट्र)
संस्थापक साहित्य सेतू, संचालक – इन्श्युरन्स अॅकॅडमी
अध्यक्ष – कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट, संस्थापक – देवालय सेवा फाउंडेशन
लेखक, ब्लॉगर, वक्ते, शिक्षण तज्ज्ञ, उद्योजक, इंडॉलॉजिस्ट, सल्लागार, डिजिटल कंटेंट डेव्हलपर, सृजनशील नाविन्यपूर्ण आणि सामाजिक संकल्पनांवर कार्य.
आत्तापर्यंत विविध विषयांवर १२ पुस्तके विविध भाषांमध्ये स्व-प्रकाशित
संकेतस्थळ: www.kshitijpatukale.com
अनिल गंगाधर कुलकर्णी
संस्थापक -सदस्य (पुणे, महाराष्ट्र)
जेष्ठ प्रकाशक, आयोजक, साहित्य चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते
संस्थापक - अनुबंध प्रकाशन , ६०० हुन अधिक पुस्तके प्रकाशित
कार्याध्यक्ष - मराठी प्रकाशक परिषद.
संस्थापक सचिव - वाङ्मयसेवा प्रतिध्वज ग्रंथालय
सचिव - मराठी बालकुमार संस्था
८९, ९०, ९१ व ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामधील ग्रंथप्रदर्शन समिती प्रमुख.
प्रचिती तलाठी गांधी
संस्थापक -विश्व विभाग प्रमुख (दुबई)
वकील.
दुबई, संयुक्त अरब एमिरेट
एमीरेट्स एअरलाईन फेस्टिवल ऑफ लिटरेचरच्या समन्वयक कार्यकर्ती
लेखन, अनुवाद, पुस्तक परीक्षण
शिल्पा परांडेकर
संस्थापक -सदस्य (पुणे, महाराष्ट्र)
Aspiring writer, traveller, photographer, blogger.
विविध प्रांतातील भिन्न-भिन्न संस्कृती, विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृती जाणून घेणे आणि त्यासाठी भटकंती करण्याची आवड. याच विषयवार आधारित माझे पहिले पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
लोककला, साहित्य, प्रवास, खाद्यसंस्कृती अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याचा मानस आणि त्यादृष्टीने वाटचाल सुरु आहे.
शिक्षण: बी.ए. (अर्थशास्त्र). PGDBA (मार्केटींग), पत्रकारिता
प्रा. अनिकेत पाटील
संस्थापक -सदस्य (पुणे, महाराष्ट्र)
प्रा. अनिकेत पाटील यांचे मूळ गाव हे सांगली जिल्ह्यातील रेड हे खेडेगाव.
मराठी साहित्य - भाषा क्षेत्रात भरीव कार्य व स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने जून २०१७ पासून साहित्य सेतू या संस्थेमध्ये समन्वयक म्हणून पूर्णवेळ कार्यरत.
कादंबरी, समीक्षा, साहित्यावर आधारित भारतीय व विदेशी चित्रपट हे विशेष आवडीचे व अभ्यासाचे विषय.
पूर्वा निखिल धारप
संस्थापक -सदस्य (पुणे, महाराष्ट्र)
सॉफ्टवेअर आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात २५ वर्षे
ग्रंथपाल, शास्त्रीय संगीत गायिका, डबिंग आर्टिस्ट आणि भाषांतरकार
गेली २५ वर्षे ग्रंथपाल म्हणून नोकरीचा अनुभव. मुख्य अनुभव सॉफ्टवेअर आणि इन्फरमेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रातला. लायब्ररी सॉफ्टवेअर चा आराखडा उत्तम रीतीने तयार करण्यात सहभाग. शास्त्रीय संगीताची मनापासून आवड.
राजेन्द्र खेर
मार्गदर्शक (पुणे, महाराष्ट्र)
जेष्ठ साहित्यिक कै. भा. द खेर यांचे चिरंजीव,
चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शन व लेखन
दहा मराठी पुस्तके प्रकाशित
इंग्रजी, गुजराथी, हिंदी भाषांमधून अनुवादित
भाऊ तोरसेकर
मार्गदर्शक (मुंबई, महाराष्ट्र)
ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि प्रसिद्ध ब्लॉगर
त्यांचा "जागता पहारा" या नावाचा मराठीतील सर्वांत जास्त वाचला जाणारा ब्लॉग आहे.
कवी म. भा. चव्हाण
मार्गदर्शक (पुणे, महाराष्ट्र)
जेष्ठ कवी आणि गझलकार.
'धर्मशाळा' हा व.पु. काळे यांनी संपादित केलेला कवितासंग्रह प्रसिद्ध. 'वाहवा' हा कवी सुरेश भट यांनी संपादित केलेला गझलसंग्रह प्रसिद्ध. 'दुनिया' हा अखंड कवितासंग्रह प्रसिद्ध. 'प्रेमशाळा' या कवितादर्शनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद.
नियतकालिके, पाठ्यपुस्तके, वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन आणि चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. राम कदम, गजानन वाटवे, चंद्रशेखर गाडगीळ, भीमराव पांचाळे, अच्युत ठाकूर, रवींद्र साठे, रोषन सातारकर आदींनी गीते स्वरबद्ध केली आहेत. अनेक मानाचे सन्मान आणि जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित. 'शहर पुण्याचा कवी' हा निवडक दर्जेदार कवितांचा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.
प्राचार्य श्याम भुर्के
मार्गदर्शक (पुणे, महाराष्ट्र)
माजी उपमहाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र
सदस्य पुणे महानगरपालिका मराठी भाषा समिती, कार्यध्यक्ष- कथाभारती,
कार्यध्यक्ष- अ. भा. सांस्कृतीक संघ, कार्याध्यक्ष अ. भा. साहित्य परिषद, पुणे शाखा
विविध विषयांवर एकूण २२ पुस्तके प्रकाशित. अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच काही नाटक आणि मराठी चित्रपटांमध्ये भुमिका केली आहे.
प्रकाश भोंडे
मार्गदर्शक (पुणे, महाराष्ट्र)
१९७० पासून गेली ४३ वर्षे संयोजक सूत्रधार, १७ वर्षे कार्यकारी विश्वस्थ - स्वरानंद प्रतिष्ठान, आजवर ८०० हुन अधिक कलाकारांना (गायक-गायिका-वादक-निवेदक), रंगमंच संधी, मान्यवरांचे गौरव सोहळे, विविध संकल्पनांवर कार्यक्रम, हजारो प्रयोग,
सध्या मराठी भावगीताचा इतिहास/कोश तयार करण्याचा प्रकल्प