विश्व मराठी परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आयोजित
अमेरिकेतील मराठी बांधवांसाठी
पंचांग कसे पहावे ?
ऑनलाईन अभ्यासक्रम
भीष्म इंडिक फाउंडेशन
विश्व मराठी परिषद
दोन महिन्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम
२१ ऑक्टोबर ते १० डिसेंबर २०२३
दर शनिवारी-रविवारी | प्रत्येकी दीड तास | Zoom द्वारे
PT : 7:30 am to 8.30 am | ET : 10:30 am to 11.30 am
आचार्य : सोमयाजी सुहोता आपटे, अग्निहोत्री
आपटे कुटुंबाला २०० हून अधिक वर्षांची पौरोहित्य आणि याज्ञिकीची परंपरा
महासोमयाग फेब्रुवारी २०२३ चे मुख्य यजमान
एक उत्तम करियर संधी | आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम
12 वर्षापुढील सर्व महिला व पुरुषांना मुक्त प्रवेश
उजळणीसाठी सर्व अभ्यासवर्गांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे
पंचांग कसे पहावे?
प्राचीन भारतीय शास्त्रशुद्ध, सुलभ कालगणना पद्धती अर्थात पंचांग...पंचांग म्हणजे पारंपारिक हिंदू दिनदर्शिका..
पार्श्भूमी: - पंचांग म्हणजे काय ? कालाय तस्मै नमः हे भारतीय संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण प्रतिपादन आहे. अनुकूल समयी जे कार्य केले जाते त्यामध्ये यशाची शक्यता अधिक असते. योग्य काळ, योग्य वेळ सांगण्याचे जे शास्त्र आहे त्याचे नाव पंचांग असे आहे. प्राचीन भारतीय वैज्ञानिक ऋषी मुनी यांनी संपूर्ण खगोल विज्ञान म्हणजे ग्रह, तारे, राशी, नक्षत्रे यांना अत्यंत सुलभ पद्धतीमध्ये पंचांगाच्या रूपाने प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवले होते. पंचांग म्हणजे काळाची पाच अंगे... १) वार २) तिथी ३) नक्षत्र ४) योग आणि ५) करण. या पाच अंगांनी मिळून ग्रह मंडलाचा आणि ब्रम्हांडाचा वेध घेणे म्हणजे पंचांग होय. विविध प्रकारचे धार्मिक विधी, अनुष्ठाने, व्रते, विविध संस्कार, उदा. विद्या संस्कार, नामकरण विधी, विवाह संस्कार, त्याचप्रमाणे नवीन कार्याची सुरुवात, वास्तू प्रवेश, व्यवसायाची सुरुवात, विविध मंगलकार्ये इतकेच नव्हे तर प्रवासाची सुरुवात करतानाही पंचांग पाहण्याची भारतवर्षामध्ये हजारो वर्षांची परंपरा होती. त्यातूनच जगातील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध अशी प्राचीन भारतीय सभ्यता विकसित झाली होती.
पंचांग शब्दाचा अर्थ -
" पंचानाम् अंगानां समाहारः ।
- अर्थात ज्यात पाच अंगांचा समावेश असतो ते ( पंचांग हा मुळचा 'संस्कृत' शब्द आहे ).
पंचांगात तिथी, वार, नक्षत्र, योग व करण या पाच बाबींशिवाय आणखीही माहिती असते; जसे शक, संवत्सर, अयन, ऋतू, मास, पक्ष, राहुकाल तसेच पंचांगात ग्रहांचे योग देखील वर्तवलेले असतात. पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय व ज्योतिषींना लागणारी माहिती दिलेली असते. विवाह - मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन, कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण-उत्सव, जयंती, पुण्यतिथी, यात्रा, रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहिती, धार्मिक कृत्यां विषयीचे निर्णय आदी गोष्टी पंचांगांत सापडतात. पंचांगामागे विज्ञान आहे आणि तर्कबुद्ध विचार आहे. त्याच्या आधारावर शेकडो वर्षे प्रयोग करून, नोंदी ठेवून पंचांग शास्त्र विकसित झाले आहे. त्याचे स्वरूप अत्यंत सुलभ असल्याने अगदी खेड्यापाड्यातील शेतकरी, कारागीर व इतर सर्व बांधव पंचांगांचा आधार घेऊन शेती, शेतीविषयक अन्य कार्य, सण, उत्सव यांचे आयोजन व नियोजन करीत असतात. अजूनही भारतामध्ये ८०% हून अधिक लोक विविध कारणांसाठी पंचांगांचा आवर्जून वापर करतात.
सध्या आधुनिक काळात पारंपारिक दाते, रुईकर, कालनिर्णय इ. छापील पंचांगां बरोबरच पंचांगांचे दृक पंचाग, दाते पंचांग, पंचाग, हिंदू कॅलेंडर असे अनेक ॲप्सही विकसित झाले आहेत आणि ते सहजपणे उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा वापर कसा करायचा याची आपल्याला काहीच माहिती नसते. तसेच ते सोपे व सुलभ आहे. पण आपण कधी त्याच्या वाटेला गेलेलो नसतो, म्हणूनच पंचांग कसे पाहावे हा ऑनलाइन अभ्यासक्रम आम्ही सादर करीत आहोत. पंचांगाची थोडक्यात माहिती
१) वार - आठवड्याचे वार. उदा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.
२) तिथी - शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा आणि कृष्ण प्रतिपदा ते अमावस्या
३) नक्षत्रे - २७ आहेत
४) योग - २७ आहेत
५) करण - ११ आहेत
याचबरोबर सूर्योदय, सूर्यास्त, शुभ - अशुभ दिन, अयन, ऋतू,महीना, चंद्रराशी, रविराशी, गुरुराशी, शुक्राराशी, शास्त्रार्य, राशिप्रवेश, राहूकाल, चंद्रोदय, चंद्रास्त, इ. तसेच पंचांगात अनेक धार्मिक व सामाजिक रुढी/विधी/परंपरा आदिंविषयी विवेचन असते. त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे-
• अवकहडा चक्र, • गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके, • गर्भाधान संस्कार, • गुणमेलन, • गृहप्रवेश, • ग्रह उपासना, • ग्रहदशा, • ग्रहपीडा, • रोज पहाटे साडेपाच वाजताची आकाशातील ग्रहस्थिती, • ग्रहांच्या अंतर्दशा, • चंद्र व सूर्य यांचे उदयास्त, नक्षत्रभ्रमण आणि त्यांची ग्रहणे, • जत्रा, यात्रा, कुंभ मेळे, • ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेली ग्रहगती, • दाने व जप, • धर्मशास्त्रीय शंका समाधान, • नवग्रह स्तोत्र, • नवमांश, • नांगरणी - पेरणीपासून ते धान्य भरण्यापर्यंत मुहूर्त व इतर माहिती,• बारसे, • पायाभरणी, • भूमिपूजन, • विविध मुहूर्त, • राजकीय व सामाजिक भविष्ये, • राशींचे घातचक्र, • लग्नसाधन, • वार, • वास्तुशांती, • व्रत वैकल्ये, • विवाह, • सण, उत्सव, • संतांची जयंती व पुण्यतिथी, • हवामान व पर्जन्यविचार, इत्यादी, तिथी, योग, करण आदी
पंचांग कसे पहावे हा अभ्यासक्रम कुणासाठी आहे ?
१) अगदी प्रत्येकासाठी... प्रत्येक भारतीयासाठी
२) स्त्री/ पुरुष/ किशोर/ युवा
३) विविध व्यवसायिक/ उद्योजक/ नेते मंडळी
४) पौरोहित्य करणारे/ ज्योतिषी
५) अत्यंत रंजक आणि सोपे ... त्यामुळे अगदी लहान मुलांपासून सर्वांनी याचा अभ्यास करावा आणि पंचांग कसे पहावे ते शिकून घ्यावे. विशेषतः किशोर/ युवा यांना यातून प्राचीन भारतीय कालगणनेची माहिती होईल.
या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती (Brochure) व्हॉट्सअॅपवर मागवण्यासाठी 16503151128 या क्रमांकावर Panchang असा मेसेज पाठवा.
पंचांग कसे पहावे ? या अभ्यासक्रमानंतर कोणती कौशल्ये प्राप्त होतील?:
१) पंचांग - प्राचीन भारतीय कालगणना पद्धतीची माहिती होईल.
२) वार, तिथी, नक्षत्र, योग, करण यांची माहिती होईल.
३) सूर्योदय, सूर्यास्त यांच्या वेळा तसेच आकाशातील ग्रह, नक्षत्रांची स्थिती सांगता येईल.
४) शुभ अशुभ काळ याचे निदान करता येईल.
५) विविध मुहूर्त सांगता येतील, त्यांची माहिती घेता येईल.
६) ज्योतिष शास्त्राची तोंड ओळख होईल.
७) विविध राशी व नक्षत्रांची माहिती होईल.
८) विविध ग्रह आणि ग्रहांचे स्वामी यांची माहिती होईल.
९) विवाहासाठी गुण मिलन कसे करतात याची माहिती होईल.
१०) विविध ॲप्स वरून पंचांग कसे पाहायचे त्याचे कौशल्य प्राप्त होईल.
चौकशी / माहितीसाठी संपर्क :
रश्मी बर्वे - 1-650-3151128 (Call / WhatsApp)
Email: bhishmaindicusa@gmail.com
10685 Grapnel Place Cupertino CA 95014 USA
भारतातील कार्यालय :
मो: 7030411506 / व्हॉट्सअॅप: 9503864401
(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)
ईमेल: sampark@vmparishad.org
विश्व मराठी परिषद कार्यालय : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४