top of page

लेखकाचे ऑनलाइन बुक स्टोअर 

लेखकांच्या पुस्तकांची अधिकाधिक विक्री आणि त्यांच्याकडून नवनवीन पुस्तकांची निर्मिती व्हावी यासाठी विश्व मराठी परिषदेने “लेखकाचे स्वत:चे ऑनलाइन बुक स्टोअर” हा एक नविन उपक्रम सुरु केला आहे. आता लेखकांना स्वत:चे ऑनलाइन बुक स्टोअर उघडून आपल्या पुस्तकांचा खप लक्षणीयरित्या वाढवता येईल. हा उपक्रम प्रकाशकांनाही अत्यंत उपयुक्त आहे. 

Online Book Store.jpg

 “ऑनलाइन बुक स्टोअर” कशासाठी ?

प्रकाशक  पारंपरिक व्यवस्थेद्वारे पुस्तक विक्री करतो. लेखक म्हणून आपली पुस्तके जास्तीतजास्त विकली जावीत अशी लेखकाची नक्कीच इच्छा असते. मात्र यासाठी प्रयत्न करण्यावर बंधने असतात. कारण पुस्तके आणि व्यवहार प्रकाशकांच्या ताब्यात असतात.

पारंपारिक व्यवस्था= प्रकाशक-> मोठे पुस्तक विक्रेते -> पुस्तक दुकानदार -> वाचक

ऑनलाइन व्यवस्था = प्रकाशक / लेखक -> थेट वाचक

प्रकाशकांना पुस्तकाच्या छापिल किंमतीवर मोठे पुस्तक विक्रेते आणि पुस्तक दुकानदार  यांना ३५ ते ४० टक्के ( काही वेळा ४५ टक्के ) कमिशन द्यावे लागते. त्याशिवाय ६ महिने ते १ वर्ष (कधी कधी २ वर्षे) एवढे क्रेडीट द्यावे लागते. यामुळे एकंदरीत पुस्तक प्रकाशन आणि वितरण व्यवहार गुंतागुंतीचा होतो. लेखकाला यामध्ये फारसा हस्तक्षेप करता येत नाही. वाचकाला छापिल किंमतीलाच पुस्तके घ्यावी लागतात. 

  • ऑनलाइन व्यवस्थेमध्ये प्रकाशक / लेखकाकडे वाचकाकडून पुस्तकाचे पैसे अगोदर येतात.  

  • वाचकाला मुखपृष्ठ आणि पुस्तकाविषयी सर्व माहिती सहजपणे ऑनलाइन पाहता येते. तसेच सध्या अनेक सोप्या ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आजकाल बहुतेक वाचक ऑनलाइन मागवणे पसंत करतो.

  • लेखकाला प्रकाशकाकडून चांगली सवलत मिळाल्यामुळे काही सवलत तो ग्राहकाला देऊ शकतो. वाचकाला पुस्तके खरेदी करताना सवलत (Discount) मिळाल्यास आनंद होतो. वाचकाला लेखकाची सही असलेली पुस्तके मिळतील. त्याचबरोबर लेखकाला त्याच्या इतर पुस्तकांची माहिती वाचकांना कळवता येते. लेखकाकडे वाचकांची माहिती राहते आणि भविष्यात संपर्क करता येतो. लेखक आणि वाचक यांच्यामध्ये एक भावनिक नाते तयार होते. 

  • लेखकाच्या स्वत:च्या ऑनलाइन बुक स्टोअरमुळे पुस्तकांची विक्री वाढेल. पुस्तकांची आवृती लवकर संपेल आणि लेखकाला नवनवीन पुस्तके लिहिण्यास प्रेरणा मिळेल.

  • ही व्यवस्था हातळण्यास अत्यंत सोपी आणि व्यवहार पूर्णत: पारदर्शक आहे.

या सेवेअंतर्गत...
१) आपले अद्ययावत ऑनलाइन बुक स्टोअर बनवले जाते. यामध्ये आपली पुस्तके विक्री साठी उपलब्ध करणे आणि लेखकाच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पेमेंट स्विकारणे (डेबीट/क्रेडिट कार्ड/UPI इ. ) अशी व्यवस्था आहे.
२) यामध्ये लेखकाची २ पुस्तके अपलोड करून दिली जातील आणि पुढील पुस्तके कशी अपलोड करावी याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. याचबरोबर वितरण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.
३) ऑनलाइन स्टोअर चे प्रमोशन करुन अधिकाधिक ग्राहंकापर्यंत कसे पोहोचावे यासंदर्भात मार्गदर्शन केले जाईल.
नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक गोष्टी
१) खाली दिलेल्या "नोंदणी करा" बटनावर क्लिक करुन आपली ऑनलाइन नोंदणी करा.
२) नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ४८ कामकाजीय तासांच्या आत (रविवार सोडून) तुम्हाला आमच्याकडून ईमेल किंवा  व्हॉट्सअ‍ॅप वर सुचना पाठवल्या जातील.
३) त्यानंतर आवश्यक गोष्टी आपल्याला आमच्या ईमेलवर पाठवायच्या आहेत. उदा.
 KYC माहिती, स्टोअर चे नाव, बॅंक खाते, दोन पुस्तकांची माहिती -  मुखपृष्ट, ब्लर्ब, पाने, किंमत इ. 
४) तुमची माहिती आल्यानंतर आमच्याकडून आपले स्टोअर बनवले जाईल. त्यानंतर तुम्हाला पुस्तके अपलोड करणे आणि त्यांचे वितरण करणे इ. सदर्भात ऑनलाइन लाइव्ह मार्गदर्शन दिले जाईल.
५) स्टोअर सुरु करण्यासाठी येणार खर्च : स्टोअर चालू करण्यासाठीचे आमचे सेवा शुल्क एकदाच भरायचे आहे. स्टोअर साठी ऑनलाइन पेमेंट कलेक्ट करणारी व्यवस्था अर्थात पेमेंट गेटवे सर्विस आपल्याकडून प्रत्येक पुस्तकाच्या विक्री किंमतीमागे फक्त २.६% इतकी रक्कम घेते आणि हे फक्त विक्री झाल्यानंतरच द्यावे लागते. तसेच पुस्तक कुरिअर/पोस्टाने पाठवण्यासाठी लागणारा खर्च करावा लागतो. 
६) पुस्तक विक्रीचे काम आपण संगणक तसेच मोबाईल वर सुद्धा करु शकता.
नियम व अटी
१) कृपया उपक्रमाची सर्व माहिती वाचून आणि सविस्तर समजून घेऊन मगच नोंदणी करावी. कोणतीही शंका असल्यास मोकळेपणाने आधी विचारणा करावी. केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द करता येणार नाही. 
२) या सेवेअंतर्गत लेखकाचे एक ऑनलाइन स्टोअर बनवून देणे आणि पहिली फक्त २ पुस्तके अपलोड करुन देणे एवढीच सेवा समाविष्ट आहे. त्यापुढील पुस्तके लेखकाला स्वत:ची स्वत:च अपलोड करायची आहेत. त्याबद्दल बुक स्टोअर उघडताना एकदा मार्गदर्शन दिले जाईल.
३) न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण

सेवा शुल्क: रु. ४९९/- (एकदाच)

चौकशी / माहितीसाठी संपर्क - विनायक पाटुकले - मो: 8983782102 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

लेखकांचे ऑनलाइन बुक स्टोअर - विस्तृत संकल्पना

 

मराठी वाचन संस्कृतीमध्ये अभिनव प्रयोग... लेखक आणि वाचक यातील दरी मिटणार...

लेखकाचे स्वतःचे ऑनलाइन पुस्तक दालन... ( छापिल पुस्तकांचे ऑनलाईन दालन )

लेखकाची पुस्तके थेट वाचकांच्या घरी... तीही सवलतीमध्ये... प्रकाशकांनाही अत्यंत उपयुक्त उपक्रम.... लेखकाच्या उत्पन्नामध्ये  चांगली वाढ.... प्रकाशकांच्या विक्रीमध्ये वाढ....
लेखक, प्रकाशक, वाचक सर्वांना उपयुक्त उपक्रम... आधुनिक तंत्रज्ञानाचा सुलभ आविष्कार

संकल्पना - विनायक पाटुकले

 

अत्यंत सहज, सोपी कार्यपद्धती...


संकेतस्थळाची जरूरी नाही... शॉप ऍक्टची गरज नाही... फक्त बँक खाते हवे... कितीही पुस्तके ऑनलाईन दालनामध्ये ठेवता येणार... लेखकाला स्वतःची पुस्तके स्वतः ऑनलाईन विकता येणार... पैसे आधी खात्यावर जमा होणार....कोणतीही रिस्क नाही...

स्वतःची पुस्तके, कविता संग्रह, नाटके, चित्रे,  यांची स्वतःच्याच ऑनलाईन दालनातून विक्री करा... 

मराठी वाचन संस्कृती कमी झालेली नाही आणि कधीही कमी होणार नाही. जशी पोटाची भूक आहे, तशीच मनाची... भावनांची... बुद्धीची भूक कायम राहणार आहे... आता वितरणाची माध्यमे बदलली आहेत आहेत. आजच्या बदलत्या ऑनलाइन जगामध्ये वाचक पुस्तके दुकांनातून खरेदी करायच्या ऐवजी ऑनलाइन मागवत आहेत. पुस्तकांच्या प्रसाराची आणि विक्रीची माध्यमे बदललेली आहेत. पुस्तक विक्री कमी होत नसून या उपक्रमामुळे त्यात वाढ होईल. पुस्तकांबरोबरच हल्ली बहुतेक सर्वच गोष्टी ऑनलाइन मागवल्या जातात. गंमत म्हणजे अमेझॉन कंपनीची सुरुवात ऑनलाईन पुस्तक विक्रीतून झाली आहे. 

विश्व मराठी परिषदेने “ऑनलाइन बुक स्टोअर” हा एक नविन उपक्रम लेखक आणि प्रकाशकांसाठी उपलब्ध केला आहे. याद्वारे तुम्ही लेखक असाल, प्रकाशक असाल किंवा एक पुस्तकप्रेमी असाल ज्याला पुस्तक विक्री करुन साहित्य सेवेबरोबरच पर्यायी अर्थार्जन करायचे आहे, अशा सर्वांसाठी ही कल्पना उपयोगी आहे.


सध्याची परिस्थिती पाहता लेखक प्रकाशकाकडे आपले पुस्तक प्रकाशनासाठी देतो. पुस्तक नविन असताना काही प्रती विकल्या जातात. परंतु कालांतराने प्रकाशक विशिष्ठ पुस्तकाच्या विक्रीसाठी सातत्याने लक्ष देऊ शकत नाही. कारण त्याच्याकडे अनेक लेखकांची पुस्तके असतात. त्याला सर्वांकडे व्यवधान पुरवावे लागते. 

जसे आपण इतरांच्या मुलांपेक्षा आपल्या स्वत:च्या मुलाची काळजी जास्त घेतो. अगदी त्याचप्रमाणे आपले स्वत:चे पुस्तक म्हणजे आपले अपत्यच असते. आपल्या अपत्याची म्हणजे पुस्तकाची काळजी प्रकाशक एका मर्यादेपर्यंतच घेऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मग आवृत्ती खपली नाही तर लेखकाच्या सृजनशीलतेचा गर्भपात होतो. त्याच्याकडून नवीन लेखन होत नाही... कदाचित त्याच्यातील लेखक मारला जातो...

प्रकाशक  पारंपरिक व्यवस्थेद्वारे पुस्तक विक्री करतो. लेखक म्हणून आपली पुस्तके जास्तीतजास्त विकली जावीत अशी लेखकाची नक्कीच इच्छा असते. मात्र यासाठी प्रयत्न करण्यावर बंधने असतात. कारण पुस्तके आणि व्यवहार प्रकाशकांच्या ताब्यात असतात. 

पारंपारिक व्यवस्था= प्रकाशक-> मोठे पुस्तक विक्रेते -> पुस्तक दुकानदार -> ग्राहक

प्रकाशकाला पुस्तकाच्या छापिल किंमतीवर मोठे पुस्तक विक्रेते आणि पुस्तक दुकानदार  यांना ३५ ते ४० टक्के ( काही वेळा ४५ टक्के ) कमिशन द्यावे लागते. त्याशिवाय ६ महिने ते वर्ष एवढे क्रेडीट द्यावे लागते. यामुळे एकंदरीत पुस्तक प्रकाशन आणि वितरण व्यवहार गुंतागुंतीचा होतो. लेखकाला यामध्ये फारसा हस्तक्षेप करता येत नाही. वाचकाला छापिल किंमतीलाच पुस्तके घ्यावी लागतात. 

 

ऑनलाइन व्यवस्था = प्रकाशक / लेखक -> थेट ग्राहक

यामध्ये लेखक / प्रकाशक ग्राहकाला १०% ते २०% सवलत देऊ शकतात. लेखकाला मानधना व्यतिरिक्त प्रकाशकाकडून ३०% ते ४० % कमिशन मिळेल. एक पुस्तक प्रिंट बुक रजिस्टर पोष्टाने पाठवण्यासाठी पोष्टाची विशेष योजना असून दोनशे पानाच्या पुस्तकाला अंदाजे रू.२५/- इतकाच खर्च येतो. जर पुस्तकाची छापिल किंमत रू. २००/- असेल तर लेखकाला ४०% म्हणजे रू. ८०/- इतके कमिशन मिळेल. त्यामध्ये पोष्टाचे रु.२५/- आणि इतर रू. ५/- असे रू. ३०/- खर्च झाले आणि वाचकाला १०% म्हणजे रू. २०/- सवलत दिली तरी मानधना व्यतिरिक्त रू. ३०/- म्हणजे १५% मिळतील. रक्कम खात्यावर आधी जमा होईल. प्रकाशकालाही यात फायदा आहे. कारण लेखक स्वतःहून विक्रीला हातभार लावत आहे आणि सहाय्य करीत आहे. शिवाय पैसे अडकून न पडता लगेच मिळत आहेत. त्यामुळे त्याचे भांडवल लवकर मोकळे होईल. तो पुन्हा नव्याने आवृत्ती काढू शकेल. पुढील आवृत्त्यामध्ये प्रकाशकांचा नफा वाढतो. त्याचाही फायदा प्रकाशकांना होईल. तसेच ग्रंथ विक्रेत्यांनाही स्वतःचे ऑनलाईन बुक स्टोअर काढता येईल. 

ऑनलाइन बुक स्टोअर ही कल्पना लेखक आणि प्रकाशकांचे यशस्वी होण्याचे स्पप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रभावी माध्यम आहे. पुस्तकांच्या विक्रीसाठी प्रकाशकांबरोबर आता लेखक व त्याचे कुटुंबिय, मित्रमंडळी आणि सहकारी ही जोमाने प्रयत्न करतील. या ऑनलाइन स्टोअर मध्ये आपल्या पुस्तकांची माहिती म्हणजे पुस्तकाचे नाव, कव्हर फोटो, ब्लर्ब, किंमत, इ. माहिती अपलोड केली जाते. या एका स्टोअर मध्ये कितीही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करुन देता येतात आणि भविष्यातील पुस्तके समाविष्ठ करता येतात. पुस्तके अपलोड केल्यानंतर प्रत्येक पुस्तकाची स्वतंत्र लिंक तयार होते आणि ती शेअर करता येते.  ही लिंक क्लिक करुन वाचक तुमचे पुस्तक ऑनलाइन पेमेंट करुन घरपोच मागवतो. या ऑनलाइन स्टोअर मध्ये ऑनलाइन पेंमेंट घेण्याची व्यवस्था आहे. ज्या वाचकांनी पुस्तक ऑर्डर केले आहे त्याचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक आपल्याकडे येतो. त्यानंतर त्यांच्या पत्त्यावर मागवलेले पुस्तक पोस्टाने किंवा कुरिअरद्वारे पाठवायचे आहे. पुस्तकासाठी आलेली रक्कम २-३ दिवसांत तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाते. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे याच ऑनलाईन स्टोअरद्वारे पुस्तकांसोबत इतर कोणत्याही वस्तू ऑनलाइन विकता येतात. कलाकूसर केलेल्या वस्तू, कलाकृती, चित्रे, वस्तू, मूर्ती, असे कोणतेही उत्पादन (अन्न / द्रव्य सोडून ) शोभेच्या वस्तू, फोटो फ्रेम्स आणि बरेच काही.

सेवा शुल्क: रु. ४९९/- (एकदाच)

bottom of page