Acerca de
कथन
आपल्या कथा विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलवर प्रसिद्ध करा.
या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खालील नोदणी अर्ज भरा आणि त्यानंतर दिलेल्या ईमेलवर आपली कथा पाठवा.
उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खालील सूचना वाचाव्यात:
१) आपल्या सर्वोत्तम फक्त २ कथा पाठवाव्यात. कथा कोणत्याही विषयावरील असू शकतात. मात्र त्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या नसाव्यात
२) कथा २००० ते ३००० शब्दात असावी.
३) कथा युनिकोड मध्ये ईमेलवर किंवा वर्ड फाईल मध्ये टाईप करुन पाठवावी. PDF किंवा इमॅज पाठवू नये.
४) कथा स्वलिखित असाव्यात.
५) एक किंवा दोन्ही कथा पुढील माहितीसोबत एकाच ईमेलमध्ये पाठवा.
कथा ईमलेवर पाठवण्यापूर्वी सोबतचा अर्ज जमा करावा.
वरील अर्जामध्ये भरलेल्या आपल्या ईमेलवरुनच कथा पाठवावी.
कथा पाठवण्यासाठी ईमेल : vms@vmparishad.org
ईमेल पाठवताना विषय लिहावा - "कथन" उपक्रमासाठी कथा
६) आपण पाठवलेल्या कथांचे परिक्षण करुन निवड केली जाईल आणि निवडक कथांचे अभिवाचन केले जाईल.
७) हा उपक्रम नि:शुल्क आहे. कथांच्या अभिवाचनाचे रेकॉर्डिंग विश्व मराठी परिषदेद्वारेच केले जाईल.
८) कथेच्या संहितेचे अधिकार लेखकाकडे असतील. निर्मिती आणि प्रकाशनाचे हक्क विश्व मराठी परिषदेकडे असतील.
९) कथेच्या व्हिडिओ मध्ये कथाकाराचे नाव, शहर आणि संपर्क क्रमांक प्रसिद्ध केला जाईल.
१०) जानेवारी २०२२ पासून युट्युबवर व्हिडिओ प्रसिद्ध होतील. दर आठवड्याला दोन कथा प्रसिद्ध होतील.
११) कथा पाठवण्यासाठी तारखेची मुदत नाही. प्रथम नोंदणी प्रथम प्रसिद्धी याप्रमाणे कथा युट्युबवर प्रसिद्ध होतील. निवड झालेल्या व्यक्तींची यादी याच कथन पेजवर डिसेंबर पासून उपलब्ध होईल.
१२) न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण
विश्व मराठी परिषद: व्हॉट्सअॅप: 7066251262
संकेतस्थळ: www.vishwamarathiparishad.org