katha
नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)

✅ कथालेखन ही कार्यशाळा का करावी?
कथालेखन ही एक कला आहे, तसेच ते एक शास्त्र देखील आहे. आपल्या अवतीभवती सातत्याने अनेक गोष्टी घडत असतात. या घटनांमध्येच लेखकाला कथेचे बीज गवसते. हे बीज छोटेसेच असते. परंतु ते फुलवून त्याचे कथेमध्ये रुपांतर करणे हे एक कौशल्य असते. ना. सी. फडके, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर अशा अनेक कथाकारानी अजरामर कथा लिहून कथा साहित्य समृद्ध केले आहे. आपण ही कथालेखक होऊ शकतो.
थोडंसं डोळसपणे, थोडंसं कुतूहलाने जर आपण आपल्या सभोवतालच्या जगाकडे पाहिलं तर अशी अनेक कथाबीज साद घालत असतात. ही कथेची बीज कशी शोधायची, त्यातून कथेची निर्मिती कशी करायची, कथेचा पिसारा कसा फुलवायचा, या विषयी विस्तृत मार्गदर्शन यशस्वी कथालेखक बना या कार्यशाळेत केले जाते. त्याचबरोबर कथेची विविध अंग आणि आकृतीबंध समजून घेत असताना कथेच्या विविध प्रकारांच्या अभ्यास केला जातो.