ॐकार साधना आणि व्याधी नियंत्रण
ॐ कार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...
व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. आरोग्य रक्षणासाठी अॅलोओपॅथी ही एकच चिकित्सा पद्धती नाही. प्राचीन काळापासून भारतामध्ये विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धती प्रचलित होत्या. त्यामध्ये आयुर्वेद, सिद्धऔषधी, योग, प्राणायाम, चुंबक चिकित्सा इ. अनेक प्रकारच्या पॅथी होत्या. त्यातील एक अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती म्हणजे ओंकार साधना ! तस बघायला गेल तर ती अष्टांग योगातील एक साधना पद्धती आहे आणि चिकित्सा पद्धती्ही आहे. खरंतर आजार का होतो ? व्याधी कशी निर्माण होते ? शरीरामध्ये दोष कसे निर्माण होतात ? असंतुलन कसे तयार होते ? शारीरिक आजार म्हणजे काय ? मानसिक आजार म्हणजे काय ? मनोकायिक आजार म्हणजे काय ? या गोष्टींबाबत सर्वसामान्यांना खूप कमी माहिती असते.
मानवी शरीर म्हणजे फक्त बॉडी नावाचे यंत्र नसून त्याची रचना पंचकोषांनी बनलेली असते. त्यामध्ये शरीराबरोबर प्राण, मन, बुद्धी, आत्मा इ. तत्वे जोडलेली असतात. तसेच वैश्विक स्पंदने आणि कॉस्मिक एनर्जी यांच्याबरोबरही ते जोडलेले असते. त्याचा परिणाम माणसाच्या मनावर, शरीरावर आणि एकंदरीत आरोग्यावर होत असतो. आधुनिक विज्ञान तर आत्ता म्हणते आहे की Vibrations is Life...! सारे विश्व तरंगयुक्त आहे स्पंदमय आहे.... स्पंदनानी भरलेले आहे.
ओंकार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ओंकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ओंकार साधना याचा अर्थ ओमकाराच्या उच्चारातून, ओमकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ओंकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक ( अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ओंकार साधना अतिशय उपयुक्त आहे.
आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ओंकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओंकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ओंकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ओंकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे.
▶️ कार्यशाळेतील विषय :
✅ तणाव मुक्ती आणि मनःशांती
✅ प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
✅ शरीरात व्याधी कशी तयार होते?
✅ योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
✅ पंचकोष म्हणजे काय? आणि पंचकोषाचे संतुलन
✅ षट्चक्र म्हणजे काय? षट्चक्र शुद्धी आणि समन्वय
✅ अष्टांग योग म्हणजे काय?
✅ भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
✅ मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात?
✅ आवाज आणि वाणी यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी - गायक, अभिनेते , निवेदक,शिक्षक, नेते, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, विक्रेते या सर्वांसाठी उपयुक्तता
✅ आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्तता
✅ विविध व्याधी निवारणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त
✅ वातावरण शुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी
✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक
✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✅ सर्व सहभागीना प्रमाणपत्र
सुचना:
1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअॅप: 7066251262
विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.