श्वास आणि मुद्रा थेरपी
श्वास आणि मुद्रा थेरपी - साधी, सोपी आणि प्रभावी उपचार पद्धती...
श्वास आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा पण दुर्लक्षित असा घटक आहे. श्वास थांबला की जीवन थांबले, अर्थात मृत्यू. असे म्हणतात की जन्म होतो तेव्हाच हा जीव संपूर्ण आयुष्यात किती श्वास घेणार हे ठरलेले असते. सटवाई पाचव्या दिवशीच श्वासांची संख्या कपाळावर लिहून ठेवते अशी श्रद्धा आहे. खरंतर श्वासोश्वास म्हणजे श्वास कि उचश्वास हे विज्ञान आहे. श्वास घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. श्वास म्हणजे काय? आपल्या श्वासांची मात्रा किती ? आपल्या श्वासांची लय कशी आहे ? त्याचा ताल कसा आहे ? याचा आपण कधी विचार करीत नाही. खरंतर श्वासांचे हे विज्ञान आपल्याला शालेय अभ्यासक्रमात किंवा कुठेही शिकवले जात नाही. 99% व्यक्ती चुकीच्या पद्धतीने श्वासोसश्वास करीत असतात. आपल्या फुफ्फुसांचा पूर्ण क्षमतेने वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. भारतात प्राचीन काळी ऋषीमुनीनि श्वासोश्वासाची उपचार पद्धती विकसित केली होती. ती आपल्याला या कार्यशाळेत शिकवली जाणार आहे. अगदी तसेच मुद्रा थेरपीचे आहे. हातांच्या बोटांच्या विविध प्रकारच्या मुद्रा करून त्यातून अनेक व्याधींमधून आराम मिळतो आणि व्याधी मुक्तता होऊ शकते. विविध प्रकारच्या या मुद्रा अगदी सहजपणे करता येतात. त्या एकदा समजून घेतल्या की आपल्याला कधीही आणि केव्हाही करता येतात. या कार्यशाळेत आपण श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी शिकणार आहोत आणि त्यांचा परिणामकारक वापर करून व्याधी नियंत्रण कसे करायचे हे समजून घेणार आहोत.
आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. श्वासोच्छवास, फुफ्फुसे, हृदय आणि नाडी शुद्धीकरण करण्यासाठी याचा उपयोग होतो. आपले आरोग्य नैसर्गिकरित्या उत्तम राखणाऱ्या आणि व्याधींवर नियंत्रण ठेवणाऱ्या या पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी समजून घेणे आवश्यक आहे.
▶️कार्यशाळेतील विषय :
✅ श्वास म्हणजे काय? श्वासांची मात्रा किती असावी
✅ श्वास व मुद्रांच्या मदतीने आपला डावा व उजवा मेंदू कसा कार्यान्वित करावा
✅ मनावर व भावनांवर कसे नियंत्रण ठेवावे
✅ मज्जासंस्था कार्यक्षम कशी करावी
✅ आपला अभ्यास कसा लक्षात ठेवायचा
✅ शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगती कशी करून घ्यायची
✅ तणाव मुक्ती आणि मनःशांती
✅ प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
✅ शरीरात व्याधी कशी तयार होते?
✅ योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
✅ भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
✅ मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात ? विविध व्याधी नियंत्रणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त
📲संपर्क / व्हॉट्सअॅप: 7066251262 📩
विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.