top of page

गिर्यारोहण आणि साहसी खेळ

चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा 

२३ ते २६ मे | संध्या. ८ ते ९

उमेश झिरपे

आयोजक

विश्व मराठी परिषद

गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, साहसी खेळ आणि त्यांचे आयोजन

युवक आणि साहस यांचे एक घनिष्ठ नाते आहे. फुरफुरणारे बाहू आणि अदम्य उत्साह यांना नेहमीच साहसी खेळ खुणावत असतात. तरुणपण हे पण काही फक्त वयाबरोबर निगडित नसते. अनेकदा वयाने जास्त असणाऱ्या ही व्यक्ती मोठ-मोठी साहसे आणि पराक्रम करताना दिसतात. प्रतापगड, रायगड, वासोटा, कोकणकडा, सिंधुदुर्ग इ. अनेक किल्ले, तेथे केले जाणारा दुर्गभ्रमण तसेच रॅपलिंग, रॉक क्लाइंबिंग, बंजी जम्पिंग, राफ्टिंग, रिव्हर क्रॉसिंग, पदभ्रमण, गिर्यारोहण इ. अनेक साहसी खेळांची नावे आपण ऐकलेली असतात. पण त्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसते. अगदी एव्हरेस्ट मोहिमेबद्दल आपण ऐकलेले असते. विश्व मराठी परिषदेने मुद्दाम ही विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. पहिल्या नागरीक एव्हरेस्ट मोहिमेचे संस्थापक आणि गिरी प्रेमीचे उमेश झिरपे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. केवळ भारतातीलच आणि हिमालयातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील विविध साहसी खेळांबद्दल आणि मोहिमांबद्दल ते आपल्याला माहिती देतील. याचबरोबर आपण आपल्या ठिकाणी दुर्ग मोहिमा कशा आयोजित करू शकता याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतील. साहसाची आणि मोहिमांची आवड असणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे.

कार्यशाळेतील विषय
१) गिर्यारोहण म्हणजे काय ?
२) गिर्यारोहण आणि पदभ्रमण ( ट्रेकिंग आणि माऊंटनिअरिंग ) यातील फरक....
३) गिरिभ्रमण अर्थात दुर्गभ्रमण - सह्याद्रीच्या कुशीतील किल्यांवरची भ्रमंती
४) गिर्यारोहणासाठी आवश्यक शारीरिक आणि मानसिक क्षमता आणि पूर्वतयारी कशी करावी
५) साहसी खेळ म्हणजे काय ? साहसी खेळांचे प्रकार, त्यातील जोखीम व्यवस्थापन
६) देशातील विविध राज्यातील आणि
हिमालयातील गिर्यारोहण आणि साहसी खेळ - मोहिमा आणि आयोजक
७) विदेशातील गिर्यारोहण आणि साहसी खेळ
८) गिर्यारोहण आणि साहसी खेळातील वैयक्तिक करिअर - संधी आणि आव्हाने... त्यासाठी प्रशिक्षण संस्था
९) दुर्गभ्रमण, गिर्यारोहण मोहिमा कशा आयोजित कराव्यात, त्यासाठी कोठे नोंदणी करावी ?
१०) साहसी खेळांच्या आणि गिर्यारोहण मोहिमांच्या आयोजनातील व्यवसाय संधी
११) वैयक्तिक जीवनाच्या आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत गिर्यारोहण आणि साहसी खेळांची भूमिका
१२) मुली / महिलांना गिर्यारोहण आणि साहसी खेळांमध्ये किती संधी उपलब्ध आहे ?
१३) नागरी एव्हरेस्ट मोहीम आणि इतर मोहिमांविषयीचे अनुभव
१४) साहसी खेळ आणि गिर्यारोहण आयोजक संस्थाची माहिती

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ ​ऑनलाईन लाईव्ह मार्गदर्शन - रेकॉर्डिंग शेयर केले जाईल 

तज्ञ मार्गदर्शक 

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे  

​सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.   

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ७५०/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page