top of page

जीवनाचे आणि जीवनशैलीचे व्यवस्थापन

चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा 

23 ते 26 जुलै | संध्या.8 ते 9

अभय भंडारी (प्रख्यात विचारवंत लेखक आणि व्याख्याते)

आयोजक : विश्व मराठी परिषद

आजचे गतिमान जीवन आणि त्यातील अनिश्चितता यामुळे आपल्या जगण्यामध्ये एक विलक्षण प्रकारचा ताण निर्माण झालेला आहे. मोबाईलवर सतत येणाऱ्या अपडेट्स, कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास, आसपासची गर्दी, दुभंगलेली कुटुंबे, करिअरच्या मागे लागलेले स्त्री-पुरुष, पाळणाघरात वाढणारी मुले, वृद्धाश्रमात राहणारे आई-वडील, वेळ आणि जीवन यांच्यातील तुंबळ लढाई..... मग या अशा जीवनशैलीमुळे कितीतरी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. त्यातून मग मानसिक आजार, जीवनाप्रती हतबलता, आत्महत्येचे विचार येणे हे नित्याचे झाले आहे. माणसे जणू बधिर झाली आहेत. आजची आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर समस्येची गंभीरता लक्षात येते. याचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैलीच्या व्यवस्थापनाकडे पूर्णतः दुर्लक्ष करणे. खरे तर जीवनशैली म्हणजे काय हेच अनेकांना माहिती नसते.... त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करणे हे त्यांच्या गावीही नसते. यातूनच मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यातून गंभीर घटना घडतात.
जीवनशैली ही जीवन पद्धतीशी निगडित असते. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास आणि त्याचे नियोजन, त्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे. जीवनशैलीच्या योग्य व्यवस्थापनाने आपण आपल्या अनेक समस्या सहजपणे सोडवू शकतो. जीवनातील साफल्याचा आणि आनंदाचा आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो. गतिमान जीवनाचा घटक बनलेल्या प्रत्येकासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे. छोट्या छोट्या संकल्पना नीट समजून घेतल्या तर भविष्यातील संकटांचा आपण प्रतिबंध करू शकतो.

👉कार्यशाळेतील विषय:
✅ जीवनशैली म्हणजे नेमके काय?
✅ जीवनशैली आणि जीवनपद्धती
✅ निसर्गचक्र कसे चालते ?
✅ मानवी शरीर आणि मनाची रचना
✅ जीवन म्हणजे काय आणि जीवन प्रवास
✅ जीवनातील मुख्य घटक आणि सहप्रवासी
✅ जीवनशैली संस्कार आणि संस्कृती
✅ व्यक्तिगत जीवनशैली कौटुंबिक जीवनशैली
✅ सामाजिक जीवनशैली - कार्यगत जीवनशैली
✅ दिनचर्या, ऋतुचर्या आणि दिनमान
✅ पंचकोष व आणि पंचमहाभूते
✅ करियर नियोजन
✅ संपत्ती नियोजन आणि ईश्वरी संपत्ती
✅ जीवनाचे ध्येय आणि त्यासाठी जीवनशैली
✅ जीवनशैलीचे निरंतर परीक्षण आणि संतुलन

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक 

✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

✅ ​सर्व सहभागीना प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.   

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. 750/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page