top of page

यशस्वी कथालेखक बना...

चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा 

15 ते 18 एप्रिल | संध्या. ८ ते ९

नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)

आयोजक

विश्व मराठी परिषद

यशस्वी कथालेखक बना - ही कार्यशाळा का करावी?
कथालेखन ही एक कला आहे, तसेच ते एक शास्त्र देखील आहे. आपल्या अवतीभवती सातत्याने अनेक गोष्टी घडत असतात. या घटनांमध्येच लेखकाला कथेचे बीज गवसते. हे बीज छोटेसेच असते. परंतु ते फुलवून त्याचे कथेमध्ये रुपांतर करणे हे एक कौशल्य असते. ना. सी. फडके, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर अशा अनेक कथाकारानी अजरामर कथा लिहून कथा साहित्य समृद्ध केले आहे. आपण ही कथालेखक होऊ शकतो. थोडंसं डोळसपणे, थोडंसं कुतूहलाने जर आपण आपल्या सभोवतालच्या जगाकडे पाहिलं तर अशी अनेक कथाबीज साद घालत असतात. ही कथेची बीज कशी शोधायची, त्यातून कथेची निर्मिती कशी करायची, कथेचा पिसारा कसा फुलवायचा, या विषयी विस्तृत मार्गदर्शन यशस्वी कथालेखक बना या कार्यशाळेत केले जाते. त्याचबरोबर कथेची विविध अंग आणि आकृतीबंध समजून घेत असताना कथेच्या विविध प्रकारांच्या अभ्यास केला जातो. प्रख्यात कथा लेखिका नीलिमा बोरवणकर या यशस्वी कथा लेखक बना या कार्यशाळेच्या मार्गदर्शिका आहेत. या कार्यशाळेचे वैशिष्ट म्हणजे प्रश्नोत्तरे आणि सराव प्रश्न. कथा लेखक म्हणून करियर घडवत असतानाच आज ओटीटी प्लॅटफॉर्मचं डिजिटल विश्व सर्वांना खुल झालं आहे. त्यामधील मालिका, वेबसेरीज लिहण्यासाठी कथलेखकांना मागणी आहे. ज्यांना थोडफार लिहता येतं, अशी प्रत्येक व्यक्ती कथालेखक बनू शकते. कथालेखक बनू इच्छिणाऱ्या सर्वांनी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे.

कार्यशाळेतील विषय:
१) कथा म्हणजे काय?
२)कथा - अनुभवकथन - लेख यातील फरक
३) कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
४) कथेचा जन्म व कथाबीज
५) कथालेखनाचे प्रकार
६) कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
७) उत्तम कथाकार कसे होता येईल?
८) यशस्वी कथा व कथाकार यांची वैशिष्टये

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ ​ कार्यशाळेचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाईल 

तज्ञ मार्गदर्शक 

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे  

​सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.   

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. 750/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page