top of page

छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये

कौशल्यविकास प्रमाणपत्र अभ्यासक्रम (ऑनलाईन)

3 ते 23 ऑक्टोबर | संध्या 8 ते 9.15

डॉ. अजित आपटे (शिवचरित्र संशोधक-अभ्यासक- लेखक, शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन विषयावर शेकडो व्याख्याने, व्यवस्थापक – जाणता राजा महानाट्य)

'स्वराज्यकर्ते' शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक प्रेरक सूत्र आहे ! ह्याच प्रेरकसुत्राच्या इतर अनेक सुत्रांमधील सर्वात महत्त्वाचे आहे 'सुराज्यकर्ते' हे सूत्र. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचेच अध्ययन करणार आहोत.
'सुराज्या'साठी अर्थातच लागते ती उत्कृष्ट प्रशासकीय चौकट (Administrative Management), उत्तम अर्थव्यवस्थापन (Finance management) आणि मनुष्यबळ विकासाची दृष्टी (Human Resource Management) ! महाराजांनी 350 वर्षांपूर्वी ती पुरवली आणि एक चमत्कार याच देशात संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही घडला; जो आजही आपल्या उद्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
He used to Think Global and Act Local.
मराठे, हिंदू केवळ मुकादम आणि कारकूनच घडवीत नाहीत तर स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रगतिशील राज्यकर्तेही घडवतात हा नवसाक्षात्कार त्यांनी हिंदुस्तानला आणि तो गिळू पाहणाऱ्या अनेक परकीयांनाही दिला. संपूर्ण भारतीय हिंदू परंपरेतल्या राजकीय विचारांचा मूर्तीमंत आणि परिपूर्ण आविष्कार म्हणजेच छत्रपती शिवराय !
दूरदर्शी, सम्यक प्रशासकीय धोरणे शिवरायांनी कशी आखली, राबवली ते ह्याच अभ्यासक्रमात शिकता येईल. संपत्तीची निर्मिती, संपत्तीचा विनियोग आणि संपत्तीचे वाटप या प्रभावी तिसूत्री नुसार उत्तम, शिलकी अर्थव्यवस्थापन कसे करता येते तेही इथे शिकायला मिळेल. वरील धोरणांबरोबरच राजकीय, सामाजिक बदल घडवून उत्तमरीत्या 'मनुष्यनिर्माण' कसे करता येते हेही शिवरायच समजावतील, त्यांच्या चरित्रातून !
'He converted Lambs into Lions' असे डॉ. बाळकृष्ण यथार्थपणे का म्हणत असत त्याचाही ह्याच अभ्यासक्रमामध्ये प्रत्यय येईल
तर शिकू या, जाऊ या ओजस्वी भूतकाळातून उज्वल भविष्याकडे ! 2047 कडे जय शिवराय!
विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त असा अभ्यासक्रम

▫️अभ्यासक्रम कोणासाठी ?
1) व्यवस्थापन (Management, MBA, BBA) शास्त्रातील विद्यार्थी, प्राध्यापक
2) स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक विद्यार्थी
3) शासकीय अधिकारी, उद्योजक, अभियंते
4) कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी (HR)
5) शिवचरित्र अध्यासक, लेखक, संशोधक, व्याख्याते
6) महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी
7) पछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपासून सुराज्य निर्मितीसाठी वापरलेले व्यवस्थापनशास्त्र समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी...

⬜ अभ्यासक्रमातील विषय :
☑️ भाग पहिला : कुशल सुशासनाचा वस्तुपाठ
1) सुनिश्चित ध्येय
2) व्यवस्थाकेंद्रीत दृष्टिकोन
3) जनताभिमुख प्रशासन
4) महाराज आणि पर्यावरण
5) दुर्गकेंद्रित प्रशासन
6) प्रशासनविषयक पत्रे

☑️भाग दूसरा : यशस्वी अर्थकारण
1) अर्थमूलो हि धर्म:
2) प्रजाभिमुख अर्थव्यवस्था
3) अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा
4) व्यापारी अनुसंधान
5)पैसा वाचवणे म्हणजे पैसा कमावणे - वाटाघाटीतील कौशल्य
6)अंतिम फलित

☑️भाग तिसरा : मानव संसाधनांचे प्रभावी योजन, विकास व चरित्र निर्माण
1) संकल्पना आणि अंमलबजावणी
2) मानव संसाधन विकास - कां आणि कसा ?
3) निवड आणि भरती - सर्वसमावेशक धोरण
4) मानव निर्माण – राष्ट्र निर्माण
5) कोकरांचे रूपांतर सिंहमध्ये कसे झाले?
6) योजकस्तत्र दुर्लभ:

☑️भाग चौथा : आजची उपयुक्तता आणि उपयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची आजची उपयुक्तता आणि उपयोजनाचा दृष्टिकोन

✅ अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :
1) ऑनलाईन अभ्यासक्रम – Zoom द्वारे
2) सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार.
3) ऑनलाईन परीक्षा : बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने
4) प्रत्येक सहभागी व्यक्तीला डॉ. अजित आपटे लिखित 3 संदर्भग्रंथ – अभ्यास ग्रंथ म्हणून घरपोच मिळणार
5) सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र

अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक 

✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

✅ ​सर्व सहभागीना प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. 2700/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page