छंदोबद्ध आणि मुक्तछंद कवितालेखन
🖋️शब्द, भावना व विचारांच्या कलात्मक आणि रचनात्मक मांडणीतून साकारणारे दर्जेदार व अभिजात कवित्व समजून घ्या, अभ्यासा आणि शिका...
एक तिरकस प्रश्न : कविता कुठे 'शिकवून' लिहिता येते का?
उत्तर: होय आणि नाही. दोन्हीही.
प्रश्न: दोन्हीही?
उत्तर: होय. मुळात कविता ज्यांच्या मनात असते, त्यांनाच अधिकचा अभ्यास करण्याची आस असते. कार्यशाळेत कवितेविषयीची दृष्टी, भान, दिशा, काही टिप्स व आस्वादन यांतून कवितेचा 'कान' तयार करता येतो. अशा अभ्यासातून मनातली कविता प्रगल्भ होते. त्यातून स्फूर्ती घेऊन काही जण कविता लिहितात, काही कविता जगतात. काही आस्वादक/उत्तम वाचक होतात. आपल्याला सगळेच हवे आहेत.
सगळ्या ललितकलांच्या बाबतीत शिक्षकाचे महत्त्व दिशादर्शन हेच आहे. (गुरू हा व्यापक अर्थाचा शब्द आहे.) बाकी सत्व आणि स्वत्व ज्याचे त्याचे जन्मदत्त असते. गायकाला 'आपल्याच गळ्याने' गायचे असते. चित्रकाराला कुंचल्यात 'आपल्याच कल्पनांचे रंग' भरायचे असतात. कवीला 'आपल्याच प्रतिभेचा आविष्कार' करायचा असतो. ललितकलांना शॉर्ट कट अमान्य असतो. ललितकला ह्या अंतकरणातून कलारूप घेऊन बाहेर आविष्कृत होतात. त्यामुळे AI सारखे बाहेरून घेतलेले उसनेही इथे कृत्रिम आणि वरवरचे ठरते.
म्हणून वरील प्रश्नाचे उत्तर - "होय"आणि "नाही". असे दोन्हीही आहे.
कार्यशाळेतील विषय:
▪️छंदोबद्ध कविता
1) मराठी छंदोबद्ध कवितेचा धावता इतिहास
2) कवितेतली नैसर्गिक लय, अंत:स्वर व रसनिष्पत्ती.
3)अक्षरछंद, मात्रावृत्ते व जाती यांचा थोडक्यात आढावा. काहींचा अभ्यास.
4) यती, आवर्तन व रचनाप्रभुत्व
5) शब्दांचे अंतरंग, बहिरंग, भावाशयातून विचारांची कलात्मक मांडणी. शब्दांचा रियाज.
▪️मुक्तछंद कविता
6) मराठी मुक्तछंद कवितेचा धावता इतिहास.
7) मुक्तछंद किंवा छंदमुक्त म्हणजे काय?
8) मुक्तछंद कविता म्हणजे काय नाही??
9) मुक्तछंद कवितेतील आशय व रूपबंध
10) मुक्तछंदाची लय. भाषेची समज, प्रतिमा, प्रतीके, रूपके यांचे उपयोजन...
✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक
✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✅ सर्व सहभागीना प्रमाणपत्र
❎ एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
✅ नोंदणी करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा.
📲संपर्क / व्हॉट्सअॅप: 7066251262 📩
विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.









