top of page

अमेरिकेमधे सर्टिफाइड पुरोहित बना

विश्व मराठी परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आयोजित

​अमेरिकेतील मराठी बांधवांसाठी

पौरोहित्य प्रवीण 

ऑनलाईन अभ्यासक्रम

BHISHMA Logo.jpg
भीष्म इंडिक फाउंडेशन 
विश्व मराठी परिषद.jpg
विश्व मराठी परिषद

चार महिन्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम

रोज ९० मिनिटे - २२ मार्च ते २३ जुलै २०२३

दर शनिवारी-रविवारी | प्रत्येकी दीड तास | Zoom द्वारे

 

 आचार्य : सोमयाजी सुहोता आपटे, अग्निहोत्री 

आपटे कुटुंबाला २०० हून अधिक वर्षांची पौरोहित्य आणि याज्ञिकीची परंपरा

महासोमयाग फेब्रुवारी २०२३ चे मुख्य यजमान

 

एक उत्तम करियर संधी | आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम 

परिचय श्रेणी उत्तीर्ण केलेल्या वा २. पौरोहित्याचे  प्राथमिक ज्ञान असणाऱ्या

15 वर्षापुढील सर्व महिला व पुरुषांना मुक्त प्रवेश

​​उजळणीसाठी सर्व अभ्यासवर्गांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे

भारतीय जीवन परंपरेचा पाया म्हणजे सनातन वैदिक संस्कार आणि संस्कृती आहे. दैनंदिन आणि नैमित्तिक पूजा, उपासना हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा भाग आहे. मानसिक शांती,  समाधान आणि अपार आनंददायी पूजाविधी ही एक ध्यान पद्धती आहे. पृथ्वी, आप, अग्नी, वायू व आकाश हे महत्त्वाचे पंचमहाभौतिक घटक मानवी जीवन सुसह्य करतात. या घटकांमध्ये पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. ‘आपो वै सर्वादेवता:’ या वचनानुसार पाण्यामध्ये सर्व देवता निवास करतात.  या जलदेवतेमध्येच सर्व देवतांचे आवाहन करून त्याचे पूजन करणे आणि विशिष्ट मंत्रांनी ते जल अभिमंत्रित करून त्या पाण्याने विविध उपद्रवांचे शमन केले जाते अथवा उपद्रव नष्ट केला जातो.  या विधीला उदकशांति असे म्हणतात. वास्तुशुद्धीसाठी तसेच अनेक असाध्य रोगांचे त्रास कमी करणे, धनधान्य समृद्धी, व्यवसायात यश, व्यवसाय वृद्धी अशा अनेक गोष्टींसाठी उदकशांति केली जाते. नवीन गृहप्रवेशाच्या वेळी वास्तुशांतीचा मुहूर्त नसल्यास उदकशांति  करून नवीन वास्तूत निवास करता येतो. कौटुंबिक स्वास्थ्य हरवणे, संपत्ती न टिकणे, वारंवार आजारपण, नोकरी - व्यवसायात सातत्य नसणे, कुटुंबात कलह, मुलांची अपेक्षित प्रगती न होणे, त्विवाह न होणे, घटस्फोट, अशा अनेक दोषांचे संतुलन उदकशांति  केल्याने होते असे शास्त्र सांगते. कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले तर निधनानंतर तेराव्या किंवा चौदाव्या दिवशी वास्तुशुद्धीसाठी उदकशांति  केली जाते. एखाद्या बालकाचा जन्म ठराविक तिथी, नक्षत्र, योग, करण आदि दूषित काळात झाला असेल तर सृष्टीतील पंचमहाभौतिक घटकांची वैश्विक ऊर्जा त्याला पुरेशी मिळत नाही आणि त्या बालकाचा विकास नीट होत नाही. म्हणून जनन शांती करावी लागते, असे प्राचीन शास्त्र सांगते. याबरोबरच सर्व रोग निवारण शांती,  ग्रहशांती,  नक्षत्रशांती असे अनेक शांतीविधी, विवाहविधी,  लघुरुद्र इत्यादी पूजाविधी पौरोहित्य प्रवीण या अभ्यासक्रमात आपल्याला शिकता येणार आहेत. ज्यायोगे आपल्याला यजमानांसाठी या पूजा, विधी, शांती ई. पुराणोक्त पद्धतीने विधीवत करता येतील.

या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती (Brochure) व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी 16503151128 या क्रमांकावर Paurohitya Pravin असा मेसेज पाठवा.

अभ्यासक्रमातील समाविष्ट घटक : प्रवीण स्तर

१) षोडषोपचार पूजा पद्धती, पूजा साहित्य आणि पूजेची तयारी

२) पूजा विधान - संकल्प, आवाहन, प्रतिष्ठापना, समाप्ती 

३) श्री गणेश प्रतिष्ठापना, गौरी प्रतिष्ठापना, विसर्जन, घटस्थापना, कुमारीपूजन इ. 

४) वास्तुशांती, उदक शांती,  ग्रहशांती, नक्षत्र शांती 

५) विवाह    ६) लघुरुद्र    ७) अंत्यसंस्कार 

८) पाठांतर आणि उजळणी,  शंका निवारणाचे सत्र 

९) अचूक संस्कृत उच्चारण आणि संथा 

१०) अभ्यास साहित्य (ई बुक फॉर्म मध्ये) 

११) ऑनलाईन परीक्षा

१२) रेकॉर्डिंग उपलब्ध

WhatsApp Image 2022-07-29 at 3.23_edited.jpg

प्रवीण स्तर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणती कौशल्ये प्राप्त होतील ?

१) पूजा आणि उपासना पद्धती, नवविधा भक्ती यांची माहिती होईल. प्रत्येक पूजेची तयारी कशी करावी, संकल्प कसा करावा आणि पूजा साहित्य कोणते लागते याचे ज्ञान ज्ञान प्राप्त होईल.  

षोडषोपचार पूजा पद्धतीची माहिती होईल, षोडषोपचार प्रत्यक्ष पूजा करता येईल.  (सोळा उपचारांनी पूजा) 

२) गणेशोत्सवामध्ये गणपती, गौरी प्रतिष्ठापना करता येईल. उत्तरपूजा आणि विसर्जन यथासांग करता येईल. घटस्थापना, कुमारीपूजन, कन्यापूजन, सरस्वती पूजन करता येईल. 

३) यजमानांच्या घरी पूजा, शांतीविधी करता येतील. शास्त्रशुद्ध,  पुराणोक्त पद्धतीने मंत्रोच्चारांसहित वास्तु शांती, उदक शांती, ग्रहशांती, नक्षत्र शांती, लघुरुद्र इत्यादी पूजा विधी स्वत:च्या आणि इतरांच्या घरी आत्मविश्वासाने करता येतील. कुलदेवी, कुलदेवता, कुलोपचार यांचे विषयी माहिती होईल, इतरांना माहिती देता येईल.  

४) धार्मिक विधींबाबत मार्गदर्शन करता येईल, प्रबोधन करता येईल, व्याख्याने  देता येतील. 

५) नवीन भाड्याच्या घरात जातांना गृहप्रवेश पूजा, नवीन वाहनाची पूजा, विद्या आरंभ संस्कार, विद्या संस्कार, वास्तू संस्कार, करता येतील. 

६) विविध मंदिरे, धार्मिक, सामाजिक संस्था, हॉस्पिटल्स, महाविद्यालये, विद्यापीठे, इ. ठिकाणी Faith Counsellor, Hindu Dharm Counsellor, Marriage Counsellor, Grief Counsellor म्हणून काम करता येईल.

Accreditation : हा अभ्यासक्रम अमेरिकेमध्ये IACDSC, USA संस्थेद्वारा accredited आहे. त्यामुळे Certified Purohit म्हणून काम करता येईल. तसेच विविध मंदिरे, धार्मिक सामाजिक संस्था, हॉस्पिटल्स, महाविद्यालये, विद्यापीठे यासाठी तसेच Faith counselor,  Hindu Dharma Counsellor Marriage counsellor,  Grief counsellor म्हणून काम करता येईल. 

ग्रीन कार्ड होल्डर्स आणि H 1 B  एच वन बी व्हिसाधारकांना :  हा अभ्यासक्रम एक समांतर करिअर म्हणून उपयुक्त आहे.  

अमेरिकेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे चांगल्या अर्थार्जनाची संधी मिळेल तसेच ओळखी वाढण्यास आणि नेटवर्किंग साठी उपयुक्त ठरेल.

चौकशी / माहितीसाठी संपर्क :

रश्मी बर्वे - 1-650-3151128 (Call / WhatsApp)

Email: bhishmaindicusa@gmail.com

10685 Grapnel Place Cupertino CA 95014 USA

भारतातील कार्यालय :

मो: 7030411506 / व्हॉट्सअ‍ॅप: 9503864401

(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)

ईमेल: sampark@vmparishad.org

विश्व मराठी परिषद कार्यालय : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

bottom of page