श्वास आणि मुद्रा थेरपी - साधी, सोपी आणि प्रभावी उपचार पद्धती...
श्वास आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा पण दुर्लक्षित असा घटक आहे. श्वास थांबला की जीवन थांबले, अर्थात मृत्यू. असे म्हणतात की जन्म होतो तेव्हाच हा जीव संपूर्ण आयुष्यात किती श्वास घेणार हे ठरलेले असते. सटवाई पाचव्या दिवशीच श्वासांची संख्या कपाळावर लिहून ठेवते अशी श्रद्धा आहे. खरंतर श्वासोश्वास म्हणजे श्वास कि उचश्वास हे विज्ञान आहे. श्वास घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. श्वास म्हणजे काय? आपल्या श्वासांची मात्रा किती ? आपल्या श्वासांची लय कशी आहे ? त्याचा ताल कसा आहे ? याचा आपण कधी विचार करीत नाही. खरंतर श्वासांचे हे विज्ञान आपल्याला शालेय अभ्यासक्रमात किंवा कुठेही शिकवले जात नाही. 99% व्यक्ती चुकीच्या पद्धतीने श्वासोसश्वास करीत असतात. आपल्या फुफ्फुसांचा पूर्ण क्षमतेने वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. भारतात प्राचीन काळी ऋषीमुनीनि श्वासोश्वासाची उपचार पद्धती विकसित केली होती. ती आपल्याला या कार्यशाळेत शिकवली जाणार आहे. अगदी तसेच मुद्रा थेरपीचे आहे. हातांच्या बोटांच्या विविध प्रकारच्या मुद्रा करून त्यातून अनेक व्याधींमधून आराम मिळतो आणि व्याधी मुक्तता होऊ शकते. विविध प्रकारच्या या मुद्रा अगदी सहजपणे करता येतात. त्या एकदा समजून घेतल्या की आपल्याला कधीही आणि केव्हाही करता येतात. या कार्यशाळेत आपण श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी शिकणार आहोत आणि त्यांचा परिणामकारक वापर करून व्याधी नियंत्रण कसे करायचे हे समजून घेणार आहोत.