पटकथालेखन - तंत्र आणि मंत्र
📝पटकथा आणि वेबसिरीज लेखन क्षेत्रात करिअर करा...
🟧 मार्गदर्शक : श्रीनिवास भणगे (प्रसिद्ध पटकथालेखक, दिग्दर्शक, अभिनेते, भारतातर्फे ऑस्कर सन्मानासाठी भारतीय चित्रपट पाठवण्यासाठीच्या निवड समितीचे सदस्य - 2020)
🟧 कार्यशाळेतील विषय:
✅ पटकथालेखन म्हणजे काय ? ✅ कथा ते पटकथा
✅ पटकथा लेखनाची पध्दती
✅ पटकथा लेखनासाठी तयारी आणि आवश्यक कौशल्ये
✅ पटकथा लेखनाचे तंत्र आणि मंत्र (उदाहरणासह)
✅ चित्रपट, वेबसिरिज व मालिका यासाठी पटकथालेखन
✅ पटकथेची नोंदणी प्रक्रिया व कॉपीराईट
✅ पटकथा आणि वेबसिरीज लेखन क्षेत्रातील करियर व संधी
कथा आणि पटकथा यामध्ये अंतर आहे. पटकथा म्हणजे चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट आणि वेबसेरीज यासाठी लिहणे. त्यामध्ये दृष्यांच्या स्वरुपामध्ये कथा लिहली जाते. प्रेक्षकांसमोर आपले कथानक दृष्य माध्यमातून आणि घटना, प्रसंगातून सादर केले जाणार आहे, हे लक्षात घेऊन केलेली कथेची मांडणी म्हणजे पटकथा होय. त्यासाठी पटकथा लेखकाला त्याची कथा कशी सादर होणार आहे याची दृष्ये त्याच्या डोळ्यासमोर आणावी लागतात. त्याप्रमाणे कथेची दृष्यकथा स्वरूपामध्ये मांडणी करावी लागते. पटकथा लेखन हे एक विशेष प्रकारचे कौशल्य आहे. ते फार अवघड नाही, मात्र त्याचे तंत्र आणि मंत्र नीट समजावून घ्यावे लागते. एकदा ते लक्षात आले आणि त्याचे कौशल्य आत्मसात केले की मग ते सहजपणे जमू शकते. सध्याच्या काळात पटकथा लेखकांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मोठ्या प्रमाणावरील दूरदर्शनच्या वाहिन्यांना सतत कथानके हवी असतात. त्याचबरोबर डिजिटल जगामध्येही पटकथाकारांना मागणी आहे. शिवाय ओटीटी (Over The Top) या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्ममुळे वेबसेरीजची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांनाही सातत्याने पटकथाकार हवे असतात. त्यामुळे पटकथालेखन हे एक सतत मागणी असलेले क्षेत्र आहे. त्याचबरोबर माहितीपटांची संख्याही वाढत आहे. आपली संस्था, आपले प्रॉडक्ट, आपली सेवा यांची माहिती लोकांपर्यंत माहितीपटांच्या माध्यमातून नेता येते. माहितीपटांसाठीही पटकथा लेखकांची गरज आहे.
✅ मर्यादित जागा - नोंदणी आवश्यक
✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✅ सर्वांना प्रमाणपत्र व रेकॉर्डिंग
❎ एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही
✅ नोंदणी करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा.
📲संपर्क / व्हॉट्सअॅप: 7066251262 📩
विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.