top of page

वाचनकला : शास्त्र, कौशल्य आणि अनुभूती

20 ते 23 मे | संध्या. 8 ते 9

डॉ. नवनाथ तुपे (प्राध्यापक, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

👉कार्यशाळेतील विषय:
✅ वाचनाचा शोध मानवाने कसा लावला?
☑️ मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यातील फरक काय?
☑️ अध्ययन आणि सहजप्रवृत्तीची शक्तिस्थाने आणि मर्यादा कोणत्या?
☑️ जैविक न्युनतेची जाणीव हीच मानवी संस्कृतीची अट आहे काय?
☑️ वाचा सिद्धांत काय स्पष्ट करतो?
☑️ मानवाचा हेतू निर्मितीकडून भाषा निर्मितीकडे प्रवास कसा झाला?
☑️ क्रीय-प्रतिक्रिया आणि विमर्षीचिंतन(Praxis) हेच मानवाचे व्यवच्छेदक लक्षण आहे काय?
☑️ मनुष्याचा मेंदू वाचन करण्यासाठी जन्मला का?
☑️ मानवी मेंदू कोणतीही नवीन गोष्ट कशी शिकतो?
☑️ पृथ्वीवरील केवळ मनुष्य प्राणीच का वाचन करू शकतो?
☑️ मनुष्य वाचायला कधी शिकला?
☑️ वाचन माध्यम बदलले तशी विचार प्रक्रियाही बदलली का?
✅ वाचनाचे शास्त्र
☑️ वाचनाची दृश्य व्यवस्था
☑️ मेंदूतील व्हार्निके आणि ब्रोकाक्षेत्र
☑️ प्रमस्तीष्कातील स्थळ, चेहरा, आकार आणि अक्षर ओळख क्षेत्रे
☑️ मायलीन आणि चेता संस्थेचे वाचनातील कार्ये
☑️ वाचन म्हणजे चेता संस्थेची पुनर्मांडणी
☑️ वाचन ही द्वी मार्गी प्रक्रिया कशी आहे?
☑️ लेखन संहिता आणि चेतापेशींचे कार्य
☑️ वाचन प्रक्रियेचे चारस्तर
☑️ रूपबंद आणि नवीन शब्दनिर्मिती
☑️ अर्थनिर्मिती आणि अनुभूती
☑️ अर्थाचे चारस्तर
☑️ सॉक्रेटीसचे लिखित भाषेवरील आक्षेप
☑️ आलेक्सिया मेंदू (अक्षर अंधत्व)
☑️ सममिती अवबोध आणि मेंदूचे सममिती तत्व
☑️ डिसलेक्सिया

✅ वेगाने का वाचावे? आणि वाचनवेग कसा वाढतो?
☑️ तुमचा वाचन वेग किती आहे? ऑनलाईन वाचनासाठी परिच्छेद (प्रात्यक्षिक)
☑️ वेगवान वाचानासंबंधी काही निरीक्षणे?
☑️ वेगाने का वाचावे?
☑️ वेगवान वाचनासंबंधी काही प्रश्न?
☑️ वेगवान वाचनाची उद्दिष्ट्ये.
☑️ वेगवान वाचनातील अडथळे.
☑️ वाचतांना वेळ कसा वाचविता येईल?
☑️ वाचन वेग वाढविण्याचे संकेत.
☑️ चांगल्या वाचकाची लक्षणे.
☑️ वेगवान वाचनाचा सराव कसा कराल?

✅ चिकित्सक वाचन
☑️ जसा हेतू तसे वाचन.
☑️ पारायण आणि चिकित्सक वाचन दोन्हींची उपयुक्तता
☑️ चिकित्सक वाचनासाठी “गोष्ट एका मुलीची” (ऑनलाईन प्रात्यक्षिक)
☑️ चिकित्सक वाचनाचे प्रारूप कसे वापरावे?
☑️ चिकित्सक वाचनातून वास्तवाचा शोध आणि बोध

📚पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये केवळ माणूसच वाचू शकतो. केवळ अक्षरओळख म्हणजे वाचन नव्हे. वाचनाद्वारे एखादा विषय समजून घेणे, त्यातून बौद्धिक आनंद मिळवणे, त्यातील ज्ञान आत्मसात करून आपले जीवन समृद्ध व यशस्वी बनविणे असे वाचनाचे अनेक स्तर आहेत. परीक्षेपुरते वाचन हा केवळ तत्कालीन वाचनाचा भाग आहे. आपल्या दैनंदिन जीवनासाठी सुद्धा उपयुक्त असणारे ज्ञान व अनुभव माणसाने लेखनाच्या स्वरूपात जतन करून ठेवले आहे.

👉 वाचन जीवनाचे मूलभूत कौशल्य : स्वामी विवेकानंद, मा. नरेंद्र मोदी, नारायण मूर्ती, वॉरेन बफे, एलॉन मस्क, बिल गेट्स अशा आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्ती या उत्कृष्ट वाचक असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. ज्यांनी आपल्या यशस्वी जीवनासाठी वाचन ही सवय कारणीभूत असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे.
वाचन हा फक्त विद्यार्थी किंवा शिक्षक यांच्यासाठीच आहे किंवा वाचन हा केवळ छंद आहे अशी एक संकल्पना नकळत रूढ झालेली आहे. वाचन हे शास्त्र आहे, उपयुक्त कला आहे जी आपण विकसित करू शकतो याची जाणीव आपल्याला नाही.

👉वाचन संस्कृती कमी झाल्याची ओरड सर्वत्र चालते, मात्र वर्षातून बोटावर मोजण्याइतपत काही दिवसांपुरते वाचन प्रेरणा दिन यासारखे काही उपक्रम सोडल्यास याकडे फारसे गांभीर्याने पहिले जात नाही. वाचन कला शास्त्रीयदृष्ट्या शिकविण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. म्हणूनच विश्व मराठी परिषदेतर्फे या अभिनव कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

👉ही कार्यशाळा कोणासाठी?: सर्व वयोगटातील वाचक, विद्यार्थी, संशोधक/पीएचडी विद्यार्थी व मार्गदर्शक, शिक्षक, प्राध्यापक, भाषा, साहित्य, इतिहास मानव्यविद्याशाखेचे अभ्यासक, व्यावसायिक, शासकीय अधिकारी, गृहिणी व ज्या पालकांना आपला मुलांमध्ये वाचन कौशल्य विकसित करायचे आहे अशा पालकांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी ही अत्यंत उपयुक्त कार्यशाळा

🟧 मार्गदर्शक : डॉ. नवनाथ तुपे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. आजपर्यंत त्यांनी तेरा ग्रंथ आठ संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालीकातून चाळीस पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झाले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक संघटना यांनी संयुक्त विद्यमाने पुरस्कृत केलेला उत्कृष्ट शिक्षणशास्त्र ग्रंथ पुरस्कार त्यांच्या “वाचन:दिशा आणि दृष्टीकोन” या ग्रंथाला मिळालेला आहे. शालेय आणि उच्च शिक्षण स्तरावरील त्यांना अध्यापनाचा ३६ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी वेगवान वाचन, चिकित्सक वाचन आणि वाचन अध्यापन या विषयावर अनेक शिक्षक प्रशिक्षणे, कार्यशाळां, कृतीसत्रे घेतलेली आहेत.

अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक
✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✅ ​सर्व सहभागीना प्रमाणपत्र

❎ एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
✅ नोंदणी करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा.

 📲संपर्क / व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262 📩

नोंदणी शुल्क : रु. 750/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page