विश्व मराठी परिषद आयोजित
कोविड - १९ कथा लेखन स्पर्धा आणि कोविड - १९ कविता लेखन स्पर्धा
कोविड - १९ महायुद्धात सभोवतालच्या परिस्थितीवर भाष्य करा..
स्पर्धेचा निकाल १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वा विश्व मराठी परिषदेच्या युट्युब चॅनेलवर युट्युब लाइव्ह कार्यक्रमामध्ये जाहीर केला आहे. स्पर्धकांची नावे खाली प्रसिद्ध केली आहेत. निकाल कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सर्व बक्षिसपात्र आणि सहभागी स्पर्धकांचे मन:पूर्वक अभिनंदन
सर्व स्पर्धकांना १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ई-प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठवले जाईल.
देश विदेशातील संवेदनाशील आणि सृजनशील मराठी बांधवांना विनम्र आवाहन...
सभोवतालच्या परिस्थितीवर आपल्या लेखणीतून भाष्य करा...
आपल्या जाणिवा प्रकट करा...
दोन स्वतंत्र स्पर्धा - १) कोविड - १९ कथा लेखन स्पर्धा आणि २) कोविड - १९ कविता लेखन स्पर्धा
दोन स्वतंत्र गट - १) भारतातील मराठी बांधव आणि २) भारताबाहेरील–विदेशातील मराठी बांधव
-
स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही...
-
कथा आणि कविता ई-मेलवर पाठवायच्या आहेत.
-
रोख बक्षिसे, प्रत्येकाला प्रमाणपत्र आणि निवडक कथा–कवितांच्या संग्रहांची पुस्तके प्रसिद्ध होणार...
शेवटची तारीख – २० जून २०२० पर्यंत वाढवली आहे.
आयोजक - देश विदेशातील मराठी भाषिकांच्या क्षमतांना आणि सृजनशक्तीला चालना देणारे आणि सर्व प्रकारचे सहाय्य आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणारे विश्वस्तरीय ऑनलाईन मराठी व्यासपीठ --- विश्व मराठी परिषद...
कोविड - १९ महामारीने संपूर्ण विश्वात एकच हाहाकार माजवला आहे. पृथ्वीतलावरील मानवप्राण्याच्या आजवरच्या इतिहासात संपूर्ण विश्वाला एकाचवेळी ग्रासणारी अशी महाविध्वंसक महामारी पहिल्यांदाच अनुभवायला मिळत आहे. अमेरिका आणि युरोपिय देशात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर जीवितहानी झाली आहे. काय घडत आहे ते कळत नाही आणि आपण व्यक्तीश: काहीही करू शकत नाही. त्यामुळे आलेली हतबुद्धता आणि हताशा यातील सीमारेषाही इतकी पुसट होऊन गेली आहे कि आपण अक्षरश: सैरभैर झालो आहोत. कधी संपणार हा लॉकडाऊन आणि कधी पून्हा पूर्वीप्रमाणे दैनंदिन जीवन सुरू होणार या विचाराने एक सार्वजनिक सुन्नता आली आहे.
अर्थात या बिकट प्रसंगात जीवनाचा प्रवाह त्याच्या त्याच्या गतीने चालू आहे. जगभर माणसे विविध मार्गांनी सभोवतालच्या परिस्थितीबरोबर झुंजत आहेत, मार्ग काढायचा प्रयत्न करीत आहेत. एकमेकांना सहाय्य करीत आहेत. एक आगळावेगळा पुरुषार्थ सर्वत्र दिसून येत आहे. माणुसकीचे अभूतपूर्व दर्शन घडविणाऱ्या, करूणेचा महापूर निर्माण करणाऱ्या, असामान्य धैर्याचे प्रदर्शन करणाऱ्या, संयम आणि शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या घटना आपल्या आसपास सभोवती घडत आहेत. डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस यंत्रणा, सरकारी अधिकारी, जवान आणि सैनिक आपल्या कोविद कोराना महायुद्धात प्राणपणाने लढाई करीत आहेत. एका बाजूला या घटना करुणरसाचे दर्शन घडवितानाच दुसऱ्या बाजूला मूर्तिमंत क्रौर्याचेही दर्शन घडवित आहेत. मानवी मनाला रोमांचित करणाऱ्या जशा या घटना आहेत तशाच अत्यंत अस्वस्थ करणाऱ्याही घटना आहेत. मानवी व्यवहारांचे, भावभावनांचे, त्याच्या अंत:र्मनाच्या खोल डोहातील बऱ्या वाईट कोलाहलांचे, वासना विकारांचे, षडरिपूंचे, विकृतींचे आणि त्याचबरोबर सद्गुणांचे, चिरंतन नैतिक मूल्यांचे, अंगभूत माणुसकीचे दर्शनही या निमित्ताने घडत आहे. अशा परिस्थितीमध्ये देश विदेशातील संवेदनाशील मराठी भाषिकांनी करोना कोविद महायुद्धाच्या या भीषण परिस्थितीमध्ये आपल्या सभोवतालच्या घटना कथा आणि कविता या रूपात शब्दबद्ध कराव्यात असे आवाहन विश्व मराठी परिषद करीत आहेत.
भावी पिढ्यांसाठी दस्ताऐवज - हा उपक्रम म्हणजे केवळ स्पर्धा असा विश्व मराठी परिषदेचा उद्देश नाही, हे कृपया लक्षात घ्या. या निमित्ताने अखिल जगताच्या आणि भारत देशाच्या ऐन संकटाच्या आणि कसोटीच्या क्षणी मराठी बांधवांच्या अंगभूत सामर्थ्याचा आणि सृजनात्मक क्षमतेचा दस्ताऐवज भावी पिढ्यांना उपलब्ध होईल. भविष्यात आपण या महामारीतून बाहेर पडल्यावर काही वर्षांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्यांची साहित्यसेवा हा पुढील काळातील पिढ्यांनपिढ्यांना मार्गदर्शक ठरणारा ऐतिहासिक ठेवा ठरेल अशी विश्व मराठी परिषदेला खात्री वाटते.
लेखनासाठी विषय : ठराविक विषयाची सक्ती नाही. कोविड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या – ऐकलेल्या, पाहिलेल्या, वाचलेल्या, कळलेल्या आणि समजलेल्या अनुभवांवर आधारीत संवेदनाशील मनातील काहूर प्रामाणिकपणे व्यक्त करणाऱ्या कथा आणि कविता अपेक्षित आहेत.
स्पर्धेसाठी दोन स्वतंत्र गट का ? : कोविड - १९ महायुद्धात भारतातील आणि भारताबाहेरील परिस्थिती भिन्न आहे. विशेषत: अमेरिका आणि युरोपिय देशांमध्ये अभूतपूर्व, बिकट आणि आणिबाणीची परिस्थिती आहे. आखाती देश, ऑस्ट्रेलिया - न्युझीलंड, जपान, दक्षिण-पूर्व आशियाई देश आणि आफ्रिकी समूहातील देश वेगवेगळ्या पद्धतीने स्थानिक परिस्थिती हाताळत आहेत. प्रत्येक देशातील स्थिती भिन्न आहे आणि व्यवस्थेचे प्रकार भिन्न आहेत. साहजिकच तेथील आणि भारतातील अनुभवांमध्ये जमिन अस्मानाचा फरक असणार आहे. त्याचे प्रतिबिंब स्वतंत्रपणे दृष्टीक्षेपास यावे म्हणून दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत.
संकल्पना – प्रा. क्षितिज पाटुकले
मार्गदर्शक – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
स्पर्धा संयोजक – अनिल कुलकर्णी
परिक्षण समिती समन्वयक – विनोद कुलकर्णी
कथालेखन परिक्षण समिती - १) भारत सासणे, २) मोनिका गजेंद्रगडकर, ३) बबनराव, ४) निलिमा बोरवणकर
कविता लेखन परिक्षण समिती - १) राजन लाखे, २) म.भा. चव्हाण, ३) हिमांशू कुलकर्णी, ४) अंजली कुलकर्णी
बृहन महाराष्ट्र परीक्षक - सौ. पौर्णिमा हुंडीवाले
भारताबाहेरील विविध देशांतील समन्वयक – ∙ सुशील रापतवार (इंग्लंड) ∙ शशिकांत धर्माधिकारी (फ्रान्स) ∙ अजित रानडे (जर्मनी) ∙ प्रचिती तलाठी (दुबई) ∙ अश्विन चौधरी (कॅनडा) ∙ अर्जुन पुतलाजी (मॉरिशस) ∙ सुहास जोशी (ऑस्ट्रेलिया) ∙ नोहा मससील (इस्राएल) ∙ संतोष कदम (ओमान) ∙ गजानन खोलगाडे (बहारीन) ∙ भावना शेंडये (केनिया) ∙ कुमुदिनी विचारे (कंबोडिया) ∙ डॉ. राहुल रमेश देहेडकर (मस्कत) ∙ वृषाली परांजपे (मलेशिया) ∙ भूषण भाले (सिंगापूर) ∙ संतोष अंबिके (सिंगापूर) ∙ गिरीश दिवाकर (युगांडा) ∙ धनंजय मोकाशी (अबुधाबी) ∙ शिरीन कुलकर्णी (फिनलंड) ∙ गजानन हुजरे (व्हिएतनाम) ∙ सुरेश वाघमारे (कुवैत) ∙ अरुण पाटील (घाना) ∙ सतीश पाटील (झांबिया) ∙ विजय जोशी (पर्थ, ऑस्ट्रेलिया) ∙ रश्मी गोरे (मेलबॉर्न, ऑस्ट्रेलिया) ∙ भास्कर हांडे ( नेदरलँड) ∙ प्रशांत बेलवलकर (न्यूझीलंड) ∙ सुधीर जोशी (न्यूझीलंड) ∙ राहुल बागडे (चीन) ∙ दीपक शिंदे (चीन) ∙ मनोज कुलकर्णी (हॉंगकॉंग) ∙ प्रिया आपटे (स्वित्झरलॅंड) ∙ सुमित कांबळे (इंडोनेशिया) ∙ अक्षय महाशब्दे (नेदरलँड) ∙ चिन्मय सहस्त्रबुद्धे (आयर्लंड) ∙ अर्पिता कुलकर्णी (थायलंड) ∙ अमेय साठे (डेन्मार्क) ∙ अनुश्री चेंबूरकर (बेल्जीयम) ∙ संभाजी पाटील (टांझानिया) ∙ संभाजी पाटील (टांझानिया) ∙ संभाजी पल्लवी सांखे (नायजेरिया)
अमेरिकेतील विविध राज्यातील समन्वयक - ∙ निरंजन देव (न्यू जर्सी) ∙ शीतल बर्मन (कोलोरॅडो) ∙ निखिल कुलकर्णी (सॅन होजे) ∙ डॉ. सोनाली शेट्ये (न्यूयॉर्क) ∙ अमित शास्त्री (सिनसिनाटी) ∙ गुंजन पवनीकर (ऍरिझोना) ∙ विजय पाटील (वॉशिंग्टन) ∙ रोहित जेजुरीकर (नॉर्थ कॅरोलिना) ∙ मंजुषा नाईक (साऊथ फ्लोरिडा) ∙ स्वप्नील जोशी (लॉस एंजेलिस) ∙ संजय पाटील (कतार) ∙ दीपक वेताळ (शार्लट)
महाराष्ट्राबाहेरील भारतातील समन्वयक - ∙ अश्विन घोडके (दिल्ली) ∙ कपूर वासनिक (छत्तीसगड) ∙ हेमंत आगरकर (अहमदाबाद) ∙ पुरुषोत्तम सप्रे (भोपाळ) ∙ तुषार पाटील (इंदूर) ∙ वल्लभ केळकर (गोवा) ∙ सुधीर जोगळेकर (कर्नाटक) ∙ संतोष गोडबोले (जबलपूर) ∙ दिलीप खोपकर (बडोदा) ∙ स्नेहा केतकर (बंगळुरू)
प्रसिध्दी आणि मीडिया – विनायक पाटुकले
स्पर्धा समन्वयक – प्रा. अनिकेत पाटील
स्पर्धेची नियमावली
१) स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. वयाची अट नाही. बंधू-भगिनी सर्वांसाठी खूली आहे.
२) कथालेखन - शब्दमर्यादा - किमान २००० ते कमाल ३००० शब्द
३) कविता लेखन - किमान १२ ते कमाल ३० ओळी
४) आपले लेखन युनिकोड फॉन्ट मध्ये टाइप करून sampark@vmparishad.org या ईमेल आयडी वर दि. २० जून २०२० पर्यंत पाठवावेत. कृपया PDF फाईल पाठवू नयेत.
५) कथा – कविता मेलवर पाठवताना - विषय - मध्ये कोणती स्पर्धा आणि कोणता गट ते नमूद करावे. उदा. १) कोविड - १९ – कथालेखन स्पर्धा – गट – भारत, २) कोविड - १९ – कवितालेखन स्पर्धा – गट – भारताबाहेरील देश – अमेरिका ( देशाचे नाव लिहावे ) याप्रकारे...
६) ई-मेलमध्ये आपल्या कथा कविता या साहित्याच्या वर – आपले नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड, व्हॉटसअप क्रमांक, ईमेल आय-डी, स्त्री-पुरुष, व्यवसाय, जन्मतारिख ही माहिती पाठवावी. भारताबाहेरील व्यक्तींनी सध्या वास्तव्य असणाऱ्या देशाचे नाव आणि पोष्टल कोड लिहावा.
७) एका स्पर्धकाला फक्त एकच कथा आणि एकच कविता पाठवता येईल.
८) प्रत्येक सहभागी व्यक्तीला प्रमाणपत्र मिळेल.
९) निवडक कथांचा आणि कवितांचा संग्रह स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात येईल. भारतातील संग्रह आणि भारताबाहेरील संग्रह वेगवेगळे असतील.
१०) स्पर्धेचा निकाल ३० जुलै रोजी जाहीर होईल.
११) स्पर्धेसंबंधी आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. न्यायालयिन मर्यादा – पुणे शहर न्यायाधिकरण
बक्षिसांची माहिती -
१) भारतातील बांधव - दोन्ही स्पर्धांसाठी स्वतंत्रपणे प्रत्येकी १८ बक्षिसे
२) भारताबाहेरील विदेशातील बांधव - दोन्ही स्पर्धांसाठी स्वतंत्रपणे प्रत्येकी १८ बक्षिसे
पहिले बक्षिस-रू. ३,०००/- दुसरे बक्षिस-रू. २,१००/- तिसरे बक्षिस- रू. १५००/- उत्तेजनार्थ पाच बक्षिसे – प्रत्येकी रू. १०००/- विशेष दहा बक्षिसे – प्रत्येकी रू.५००/-
अधिक माहितीसाठी संपर्क – प्रा. अनिकेत पाटील (+917507207645)
विश्व मराठी परिषदेच्या उपक्रमांची व मराठी भाषा-साहित्य-संस्कृती विषयक माहिती मिळविण्यासाठी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर JOIN Vishwa Marathi Parishad असा संदेश पाठवा.
आपण या स्पर्धेत अवश्य सहभागी व्हा…
तसेच आपले देश विदेशातील नातेवाईक, मित्र आणि सहकारी यांनाही सहभागी करून घेण्यासाठी हा संदेश व्हॉटसअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अधिकाधिक शेअर करा हि नम्र विनंती…