विश्व मराठी परिषद

Feb 16, 20211 min

आयुष्य एक पतंग

आयुष्य असावं एका

पतंगा सारखं,

रंगीबेरंगी दिसणार,

स्वच्छंद हवेत उडणार,

पण

फिरकी देवाच्या हातात सोपवणार ...(१)

आपल्या ह्या पतंगाची

कणी मात्र देवच बांधतो,

आकाशी झेप घेण्यासाठी

हवेतही तोच उडवतो....(२)

किती उंच जावे

तेही तोच ठरवतो ,

आणखी किती काळ उडत राहावे त्याची तोच काळजी घेतो....(३)

कितीही हेलकावे घेतले तरीही

खाली पडण्याची

नसते त्याला भीती,

कारण त्याची मांजा - दोरी,

असते देवाच्या हाती....(४)

कधी दोरी तोडायची?

हे देवच जाणतो,

दोरी पतंगाची तुटल्यावर

त्याला स्वहस्ते झेलतो,

शांत - सुखी - समाधानी

त्याच्याच चरणांवर विसावतो....(५)

आयुष्य हे असच असावे

हेवे - दावे त्यात नसावे,

सेवा - भक्ती करता करता

त्याच्याच चरणी विलीन व्हावे...(६)

ज्योती सुनील पाटील

जोगेश्वरी मुंबई

मोबाईल नं.9820963832

ईमेल: pjyotiveera@gmail.com

    15190
    54