विश्व मराठी परिषद

Sep 11, 20201 min

आयुष्य हे असंच असतं

आयुष्यहेअसंच असतं

            कधी पक्षाप्रमाणे झेप घेतं 

            कधी खाली सरसावतं

            कधी रडतं 

            कधी झुरतं 

आयुष्य हे असंच असतं

         कधी भलामोठा त्याग करण्यासाठी सरसावतं 

         कधी कुणी आपल्या साठी त्याग करावा म्हणून वाट पहातं 

         कधी फुलपाखरा मागे धावतं 

         कधी फुलपाखरू बनून फुलांशी खेळतं 

आयुष्य हे असंच असतं


 
          कधी आकाशातील सप्तरंगांसाठी धडपडतं 

          कधी सप्तरंगांची ऊधळण करीत फीरतं 


 
          कधी नदी च्या काठावर बसून पाण्याशी खेळतं 

          कधी पाणी बनून वाट मिळेल तिकडे पळत सुटतं


 
आयुष्य जरी असं असलं

तरी ते जपायचं असतं

  संस्कारांच्या लगामाने ते सावरायचं असतं

आयुष्याला या मनसोक्त जगायचं असतं

कवयित्री: सौ. शितल शिंदे (पुणे)

मो: 9890361135

ईमेल: sheetalshinde250@gmail.com

कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.


विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

    3720
    20