Vishwa Marathi Parishad
Apr 3, 20211 min
जपूया सर्वांनी |आपले आरोग्य |
उजळले भाग्य |सर्वांचेच||१||
फळ भाजीपाला |नियमित खावा |
व्यायाम करावा| दररोज||२||
आहारविहार |ठेवा संतुलित |
आरोग्याचे हित| त्यात वसे||३||
तिरस्कार राग| चिंता करू नका |
व्यर्थ जळू नका| दुसऱ्यावर||४||
नेहमीच ठेवा| भाव समाधानी |
आनंद जीवनी| बहरेल||५||
करावीत रोज |नित्य योगासने |
रोगाची लक्षणे |नष्ट होती||६||
आयुष्य अमूल्य| व्यसन नसावे |
आरोग्य जपावे|सदोदित||७||
प्रा. प्रशांत निंबाजीराव बागुल,
नंदुरबार, ता.जि.नंदुरबार.
९४२०६०२७४०
pnb2577@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.