विश्व मराठी परिषद आयोजित युट्युब लाईव्ह मालिका
झेंडे अटकेपार
अटक आता विदेशामध्ये
दिनांक: ७ ते १५ सप्टेंबर
वेळ: संध्याकाळी ५ ते ६.१५ (भारतीय प्रमाण वेळ)
संकल्पना - प्रा. क्षितिज पाटुकले
युट्युब चॅनेल लिंक - https://www.youtube.com/c/VishwaMarathiVani
भारताबाहेरील विविध देशातील मराठी भाषिक बांधवांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची दैदिप्यमान यशोगाथा
अटकेपार झेंडे ही ऐतिहासिक काळातील मराठी माणसांच्या कर्तृत्वाची अंतिम सीमारेखा होती. मात्र २१ व्या शतकात अटकेपार झेंडे ही संकल्पना अधिक व्यापक झाली आहे. महाराष्ट्राच्या, देशाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषिक बांधवांनी गेल्या काही दशकांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात विविध देशांमध्ये जाऊन उद्योग, व्यवसाय, साहित्य, संस्कृती, सेवा, वैद्यकीय, शैक्षणिक, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, आय टी, बौद्धिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी बजावली आहे. आपल्या कर्तृत्वाची पताका उंचावली आहे. महाराष्ट्राचा आणि भारताचा मान आणि सन्मान वाढविला आहे.
आपल्या कर्तृत्वाने यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करीत असताना त्यांना आपल्या मातीपासून दूर जावे लागले, हजारो किलोमीटरचे अंतर पडले तरी आपल्या मराठी संस्कृतीशी, मराठी मातीशी त्यांची नाळ कायमची जोडलेली आहे. अटकेपार झेंडे रोवताना फक्त आपले कर्तृत्वच नाही तर आपली माणसे, आपले संस्कार, आपली शाळा, आपले बालपण, आपली माती, आपला वारसा याबद्दल त्यांच्या अंत:र्मनात सातत्याने अभिमान आणि कृतज्ञता जागृत आहे.
याचबरोबर महाराष्ट्रातील आणि भारतातील मराठी भाषिक बांधवांना भारताबाहेरील जगातील विविध देशात आपले मराठी बांधव किती कष्ट करीत आहेत आणि कोणता पराक्रम गाजवत आहेत हे जाणून घेण्याची सुप्त उत्सुकता आहे, कुतूहल आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे.
याचाच विचार करून जगभर पसरलेल्या मराठी बांधवांच्या अनुभवांचे आदान प्रदान व्हावे या उद्देशाने विश्व मराठी परिषदेने झेंडे अटकेपार ही युट्युब लाईव्ह मालिका आयोजित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यातून सामूहिक मराठी मनास आणि विशेषतः युवा पिढीला मोठया प्रमाणावर प्रेरणा मिळेल, उत्तेजन मिळेल. जगभरात कुठेही गेलो तरी आपली माणसे तेथे आहेत असा विश्वास निर्माण होईल.
या मालिकेमध्ये नऊ देशातील मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत.
१. स्वित्झर्लंड - अमोल सावरकर - ७ सप्टेंबर
२. फ्रांस - शशिकांत धर्माधिकारी - ८ सप्टेंबर
३. नेदरलँड - गिरीश ठाकूर - ९ सप्टेंबर
४. जर्मनी - अजित रानडे - १० सप्टेंबर
५. चीन - दीपक शिंदे, समीर डोरले - ११ सप्टेंबर
६. हॉंगकॉंग - मनोज कुलकर्णी - १२ सप्टेंबर
७. न्यूझीलंड - प्रशांत बेलवलकर - १३ सप्टेंबर
८. युनायटेड किंग्डम - राजीव सुभेदार, अनिल नेने, श्यामल पितळे, तेजाली शेटे, केदार लेले, रवींद्र गाडगीळ - १४ सप्टेंबर
९. ऑस्ट्रेलिया - अभिजित भिडे, रेश्मा परुळेकर, रश्मी गोरे - १५ सप्टेंबर