जीवन समृद्ध करणारा अनुभव

युवा शिबिर २०२१ 

शिवगड - मुरगुड (कागल, जि. कोल्हापूर) येथे

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

 

आयोजक: विश्व मराठी परिषद आणि

शिवगड ट्रस्ट

आजच्या आधुनिक काळात युवा पिढी संभ्रमाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते. अदम्य उत्साह, साधने आणि क्षमता असूनही जीवनाला निश्चित दिशा न लाभल्याने, जीवनाचे सर्वांगीण व्यवस्थापन करता न आल्याने अपयश आणि निराशा पदरी येते. सोशल मिडियाचा अनिवार  भडिमार व पाश्चात्य संस्कृतीचे कळत नकळत अंधपणाने केले जाणारे अनुकरण ही त्याची मूळ कारणे आहेत. अशा वेळी भारतीय जीवनशैलीतील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ संकल्पनेच्या आधारे भारतीय दृष्टिकोनातून जीवनाचे व्यवस्थापन करण्याविषयी विश्व मराठी परिषदेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल परिसरातील मुरगुड या निसर्गरम्य ठिकाणी दोन दिवसीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिवगड हे ठिकाण कोल्हापूर पासून 40 किमी अंतरावर कागल तालुक्यातील मुरगुड या गावी एका विस्तीर्ण जलाशयाकिनारी वसलेले अतिशय रमणीय आणि निसर्गरम्य असे स्थान आहे. जवळच संजीवन समाधी स्थान आणि सुंदर मंदिर आहे.
या शिबिरामध्ये करियर, अर्थ, कुटुंब, नातेसंबंध, चरित्र, चारित्र्य, मैत्री, व्यवहार याद्वारे एकूणच जीवनाचे यशस्वी व्यवस्थापन याविषयी विविध विद्वानांद्वारे मार्गदर्शन केले जाईल. तसेच पदभ्रमण, चर्चा, गप्पा, प्रश्नोत्तरे याद्वारे या विद्वानांसोबत थेट संवाद साधता येणार आहे. 
•    बौद्धिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकास 
•    चार पुरुषार्थांच्या आधारे जीवनाचे व्यवस्थापन  कसे करावे ? 
•    आपले जीवन सक्षम, संपन्न आणि समृद्ध कसे बनवावे ? 
•    करिअर आणि आर्थिक नियोजन कसे करावे ? 
•    यशस्वी जीवनाचे सूत्र उलगडवून दाखवणारे शिबीर 
•    युवा जीवनाला अद्भुत दिशा देणारा उपक्रम

माहितीपत्रक  (PDF)

नोंदणी बंद झाली आहे 

मार्गदर्शक :

•    प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख (प्रख्यात प्रवचनकार, लेखक आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)
•    राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे
•    प्रसिध्द करिअर मार्गदर्शक श्री. विवेक वेलणकर 
•    प्रख्यात लेखक आणि वक्ता प्रा. क्षितिज पाटुकले 

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नियम व अटी :

•    वयोगट : वय वर्षे १६ ते ३५ (पती-पत्नीही सहभागी होऊ शकतात.)
•    शिबीर कालावधी : ११ डिसेंबर सकाळी ९ वाजल्यापासून ते १२ डिसेंबर रात्री ७ पर्यंत 
•    निवासव्यवस्था : डॉरमेटरी व्यवस्था– युवक व युवतींची स्वतंत्र व्यवस्था (निवासाची व्यवस्था १० डिसेंबरच्या रात्रीपासून उपलब्ध)
•    शिबिरार्थी संख्या: १०० ते १२०  
•    पूर्व नोंदणी आवश्यक : प्रवेश नि:शुल्क (मात्र प्रवासाचा, जाण्यायेण्याचा खर्च शिबिरार्थीने स्वतः करायचा आहे.)
•    जेवण: सकाळी अल्पोपहार, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा व रात्रीचे जेवण (संपूर्ण शाकाहारी)
•    कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बंदी आहे. सामूहिक शिस्तीचे वर्तन आवश्यक आहे. 
•    शिबिरार्थी संख्या मर्यादित असल्याने संपूर्ण अधिकार विश्व मराठी परिषदेकडे राहील.
•    शिबिरार्थींनी स्वतः शिबीरस्थळी पोचायचे आहे. (पुणे ते पुणे अशी स:शुल्क – १० तारखेला रात्री जाण्यासाठी आणि १२ तारखेला रात्री परतीच्या प्रवासासाठी पुशबॅक लक्झरी बसची व्यवस्था उपलब्ध आहे.) 
•    काही अपरिहार्य कारणांमुळे ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल शक्य आहे. 

•    वाहन व्यवस्था : 10 तारखेला रात्री पुण्याहून मुरगुड येथे आणि 12 तारखेला रात्री मुरगुड ते पुणे अशी टू बाय टू लक्झरी स:शुल्क बस सेवा उपलब्ध केलेली आहे. 
•    देणगी : शिबीर मोफत आहे. मात्र व्यवस्था आणि अन्नदान यासाठी देणगी द्यावी असे विनम्र आवाहन आहे.

(ऐच्छिक ऑनलाईन देणगी देण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा युपीआय आयडी - vmparishad@upi वर कोणत्याही UPI अ‍ॅप वरुन रक्कम पाठवा. पाठवल्यानंतर 7030411506 या व्हॉट्सअ‍ॅपवर कळवा.)

•    सर्व कायदेशिर प्रक्रिया पुणे जिल्हा न्यायालयांतर्गत


अत्यंत महत्वाचे : शिबिरादरम्यान कोरोनाविषयक सर्व शासकीय सूचना व मार्गदर्शनानुसार काळजी घेण्यात येईल.