जसा लोखंडाला परिसस्पर्श तसा युवकांना सृजनस्पर्श

सृजनस्पर्श

केशवसुत स्मारक, मालगुंड येथे

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

 

आयोजक: विश्व मराठी परिषद आणि

कोकण मराठी साहित्य परिषद

Acting.jpg

आयुष्य समृद्ध करणारा अनुभव...  

            लेखक, साहित्यिक किंवा कलाकार यांच्या लेखनाचे किंवा कलेचे चाहते असतातच. त्यांच्या लेखनाचा-कलेचा आस्वाद आपण नेहमीच घेत असतो. मात्र त्यासोबतच अशा यशस्वी लोकांच्या जीवन प्रवासाबद्दल, त्यांच्या बालपणापासूनच्या जडणघडणीबद्दल आणि यशस्वी जीवनाच्या मागील त्यांची साधना, तपस्या, लोक, संस्कार, शिक्षण, आदर्श, आचार, विचार इत्यादी गोष्टींबद्दल देखील सामान्य रसिकांना प्रचंड कुतूहलता असते.

सर्वसामान्य दिसणारे, सर्वसामान्य जीवन जगणारे लोक यशस्वी कसे होतात? आपल्याला देखील त्यांच्याप्रमाणे बनता येईल का? किमान त्यांच्या या यशाचा आनंदाचा, चैतन्याचा अनुभव आपल्यालाही घेता येईल का?, त्यांच्या आचारांचा - विचारांचा परिसस्पर्श आपल्यालाही मिळेल का? अशी इच्छा रसिक मनोमनी बाळगून असतात. आपली ही बौद्धिक भूक भागविण्यासाठी व आपल्या आवडत्या लेखक-कलाकाराच्या अभिव्यक्तीचा शोध घेण्यासाठी आपल्याला शक्य त्या मार्गाने म्हणजे संमेलने, व्याख्याने, दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम, वर्तमानपत्रातील लेख-बातम्या यामधून प्रयत्न करीत राहतो.

अशा यशस्वी साहित्यिक-कलाकारांच्या सानिध्यात आपल्याला राहता आले तर…!

त्यांच्या जीवनप्रवास थेट त्यांच्याकडून जाणून घेता आला तर…!

त्यांच्याशी मनमुराद गप्पा करता आल्या तर…!

त्यांचा परिसस्पर्श आपल्याला देखील लाभला तर…

याची फक्त कल्पना केली तरी मन उत्साहाने-आनंदाने भरून

याच संकल्पनेतून विश्व मराठी परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले यांनी कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या सहकार्याने ‘सृजनस्पर्श’ या अभिनव उपक्रमाची सुरवात केली आहे.

●        सृजनस्पर्श संकल्पना:

१) नामवंत साहित्यिक, कलाकार, उद्योजकांसोबत चार दिवस व्यतीत करण्याची दुर्मिळ संधी.

२) त्यांच्या यशस्वी जीवन जडणघडणीचा प्रवास प्रत्यक्ष ऐकायला मिळणार.

३) कलेव्यतिरित्त जीवनातील इतर पैलू जवळून पाहता येणार.

४) त्यांच्यासोबत मनमुराद आणि खुल्या गप्पा रंगणार

५) अभिवाचन ऐकण्याची आणि सादर करण्याची देखील संधी

६)  थेट प्रश्नोत्तरांची संधी

७) सूर्यमंदिर, कातळशिल्पे, कोकण संस्कृती प्रदर्शन, पावस, अडीवरे, गणपतीपुळे येथे भेटी     

● कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) :

जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी १९९१ साली रत्नागिरी येथे कोमसापची स्थापना केली. कोमसापने ५१ जिल्हा साहित्य संमेलने, ४ महिला साहित्य संमेलने आणि १५ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कोमसापने कवी केशवसुत यांच्या जन्म ठिकाणी मालगुंड येथे त्यांचे भव्य स्मारक उभारलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कुसुमाग्रज यांनी या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी ‘हे स्मारक म्हणजे मराठी कवितेचं तीर्थक्षेत्र, तर मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे,’ असे गौरवोद्गार काढले आहेत. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून गौरविले जाणारे कविवर्य केशवसुत यांचे मालगुंड हे जन्मगाव. आपल्या कवितांमधून परंपरेच्या आणि काळाच्या बेड्या तोडणाऱ्या या कवीचे स्मारक गणपतीपुळ्यापासून अवघ्या २ किमी अंतरावर सागरकिनाऱ्यावर वसलेल्या मालगुंड या केशवसुतांच्या जन्मगावी भव्य स्मारक बांधण्यात आलेले आहे.

सृजनस्पर्श संकल्पना:

 1. नामवंत साहित्यिक, कलाकार, उद्योजकांसोबत चार दिवस व्यतीत करण्याची दुर्मिळ संधी.

 2. त्यांच्या यशस्वी जीवन जडणघडणीचा प्रवास प्रत्यक्ष ऐकायला मिळणार.

 3. कलेव्यतिरित्त जीवनातील इतर पैलू जवळून पाहता येणार.

 4. त्यांच्यासोबत मनमुराद आणि खुल्या गप्पा रंगणार

 5. अभिवाचन ऐकण्याची आणि सादर करण्याची देखील संधी

 6. थेट प्रश्नोत्तरांची संधी

 7. सूर्यमंदिर, कातळशिल्पे, कोकण संस्कृती प्रदर्शन, पावस, अडीवरे, गणपतीपुळे येथे भेटी     

मान्यवर

 • प्रत्येक सृजनस्पर्श शिबिरासाठी खालीलपैकी विविध क्षेत्रातील ३  ते ४ मान्यवर आपापल्या उपलब्धेनुसार सहभागी होतील   

 • साहित्यिक : निलिमा बोरवणकर, भारत सासणे, लीना सोहोनी, मोनिका गजेंद्रगडकर, संजय सोनवणी, अतुल कहाते, ल. म. कडू, मधु मंगेश कर्णिक, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी,

 • कवी / गझलकार : राजन लाखे, म. भा. चव्हाण, प्रदिप निफाडकर, मिनाक्षी पाटील

 • वैज्ञानिक : डॉ. ज्येष्ठराज जोशी, डॉ. अनिल काकोडकर

 • उद्योजक : रवींद्र प्रभुदेसाई, परिक्षित प्रभुदेसाई, डॉ. प्रमोद चौधरी, शंतनू खानवेलकर, सुरेश लोंढे, हणमंतराव गायकवाड

 • कलाकार : पं. मनीषा साठे, चारूदत्त आफळे, पं. विकास कशाळकर, राहुल सोलापूरकर, हेमंतराजे मावळे, विघ्नेश जोशी, योगेश सोमण, रवींद्र खरे, राम साठे, पं प्रभाकर कारेकर,

 • पत्रकार : मोरेश्वर जोशी, भाऊ तोरसेकर, मनोहर कुलकर्णी, विनोद कुलकर्णी,

 • इतर विविध क्षेत्रांतील मान्यवर : पांडुरंग बलकवडे, प्र. के. घाणेकर, अनिल गोरे, उमेश झिरपे, विवेक वेलणकर, डॉ. विश्वास मेहेंदळे, विनय सहस्त्रबुद्धे, प्रफुल्ल पाठक, मिलिंद महाजन, प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, ज्ञानेश्वर मुळे, रवी नातू 

 

बॅच १] ४ - ७ मे, २०२१

बॅच २] ११ – १४ मे, २०२१

बॅच ३] १८ – २१ मे, २०२१

बॅच ४] २५ – २८ मे, २०२१

बॅच ५] १ – ४ जून, २०२१

बॅच ६] ८ – ११ जून, २०२१

बॅच ७] १५ – १८ जून, २०२१

बॅच ८] २२ – २५ जून, २०२१

 • महत्वाचे :

एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणास्तव रद्द करता येणार नाही.

सर्व कायदेशीर प्रक्रिया पुणे जिल्हा न्यायालयांतर्गत.  

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 7500/-

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
 • Facebook Clean
 • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad