ऑनलाईन साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी पुणे येथे त्वरित  कार्यालयीन सहकारी हवेत... (महिला / पुरुष)

विश्व मराठी परिषद आयोजित साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 
कार्यालयीन सहकारी नोंदणी 

साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता या तीन माध्यमांतून देश विदेशातील १२ कोटी मराठी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाने जोडण्याचे स्वप्न उराशी बाळगून विश्व मराठी फाऊंडेशन विश्व मराठी परिषद या ना नफा ना तोटा संस्थेद्वारे कार्यरत आहे. छ. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सक्षम, संपन्न आणि समृद्ध मराठी बांधव हे ध्येय बाळगून आम्ही वाटचाल करीत आहोत. मराठी माणसाच्या सशक्तीकरणासाठी विविध प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असून उपयुक्त माहिती आणि संदेशांची देवाणघेवाण करीत आहोत. विविध उपक्रमांद्वारे जगभरातील ३६ देशांमधून, अमेरिकेतील २१ हून अधिक राज्यातून, भारतातील १२ राज्यातून आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातून विश्व मराठी परिषदेचे कार्य सुरू आहे. 

 

खालील अर्ज भरून नोंदणी करा. आपली माहिती पाहून नंतर आपल्याला संपर्क करण्यात येईल. प्रतिनिधी उत्साही, कार्यक्षम, उपक्रमशील, जबाबदार आणि मनापासून काम करणारे हवेत. ज्यांना आयुष्यात काहीतरी करावेसे वाटते अशांना प्राधान्य दिले जाईल...

कालावधी : चार महिने...( ऑक्टोबर २० ते जानेवारी २१ )

अपेक्षा :
१) संयोजनाची आणि सामाजिक कार्याची आवड
२) समन्वयक म्हणून काम करता येणे आवश्यक
३) स्वतःचा स्मार्ट फोन असणे, तसेच व्हॉटसअप, ईमेल, फेसबुक इ.  सोशल मीडिया आणि संगणक हाताळता येणे आवश्यक
४) नवीन शिकण्याची, बोलण्याची, संवादाची आवड हवी
५) अनुभवाची अट नाही
६) रोज कार्यालयामध्ये यावे लागणार नाही
७) उचित मानधन दिले जाईल. (मानधन सुमारे रु. २०,००० ते रु. २५,००० हजार, चार महिन्यांसाठी)
८) वयोमर्यादा - ३५ पर्यंत
९) प्रमाणपत्र मिळेल
१०) प्रत्येकाने विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद होणे आवश्यक ( एकदाच भरायची आजीव वर्गणी फक्त रू. ८००/-)

या संकेतस्थळावर आपली खालील माहिती अपलोड करावी. 

१) वैयक्तिक माहिती : नाव, मोबाईल क्रमांक, व्हॉटसअप क्रमांक, ईमेल, पत्ता, वय.

२) आपली शैक्षणिक पात्रता आणि  कामकाजाचा अनुभव

३) यापूर्वी मराठी साहित्य, संस्कृती व उद्योजगता विषयक उपक्रमात सहभागी झाला आहात का ? 

४) परिचय पत्र / बायोडाटा - फोटोसह (PDF/Word File)

 

 

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad