top of page

Profile

Join date: May 25, 2020

About

मी स्वप्नील अविनाश कुलकर्णी, लेखक व कवी नाशिक येथील आहे. शालेय जीवनापासून लिखाणाची आवड असल्याने वृत्तपत्रातून वाचकांच्या पत्रातून लेखनातून सुरुवात केली. त्यानंतर शालेय जीवनात शिक्षण घेत असताना ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रजांची उर्फ वि. वा. शिरवाडकर यांची 'गर्जा जयजयकार' या काव्यातून प्रेरणा घेत साहित्याकडे वाटचाल सुरु झाली. दै. सकाळ (नाशिक आवृत्ती) आयोजित सन २००० साली दिवाळी अंकात "मन महाल" या कवितेस उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आणि त्याचवेळी महाविद्यालयाच्या अंकात लेखन केले. वृत्तपत्रलेखानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

माझ्या मराठी काव्याची सन २०१८ बडोदा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्याची निवड. तसेच यंदा उस्मानाबाद येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्याची निवड. विश्व मराठी परिषदेच्या सदस्यत्वाबरोबर अखिल भारतीय साहित्य परिषद, न्यासचा नाशिक शाखेचा सदस्य आहे. धन्यवाद.


Swapnil Kulkarni

More actions
bottom of page