top of page

Profile

Join date: Dec 16, 2020

About

पहाट


पहाटओली दवात नाहली

रवीकिरणांनी प्रभात झाली

गर्द निळा अन मत्त केशरी

सप्तसुरानि सजलि अवनि

खुणावतो तो शशीधर सदनी

हलकेच खुलली जाई जूई

धुक्यामधुनी ती पहाट आली

पवनाने ती घालुन फुन्कर

प्राजक्त ही गेला बहरून

केशरी गुलाब फुलला

सदाफुली ही नाजूक हसली

अबोली अता का रुसली?

हात लाविता खुदकन फुलली

घेऊन फुलांची ही ओन्जळ

उभी अशी मी आंगणी

रिक्त करावी आता कुणाच्या

पदचरणी?

kalyani kshirsagar

More actions
bottom of page