Profile
Join date: Nov 27, 2020
About

नवा श्वास..


कसं असतं आपलं मन बघा,

काही दिवस जाता जात नाहीत,

तर काही दिवस क्षणात सरुन जातात.

कधी कधी वेळेला बंधन नसते,

तर कधी वेळ अत्यन्त महत्वाची असते.

आठवणींचं ही असंच असतं

काही आठवणी बुचकाळी मारून वर येतात

तर काही आठवणी नीटसं आठवतच नाहीत

कालचा दिवस कसा गेला हे आठवत नाही

पण 10 वर्षाखालची दिवाळी लख्ख आठवते.

रिकामे घर सणासुदींना गच्च भरून जाते

परत ये रे माझ्या मागल्या म्हणत रिते होते

घर बसल्या म्हातारा म्हातारी हेलावतात पुरते

चष्म्याआड अश्रू वाटे आठवणींचे काहूर उठते

स्काईप स्मार्ट फोनच्या जमान्यात

रोज होते भेट आपली आपल्यात

प्रत्यक्ष उराउरी भेट नोहे नसा नसात

म्हणुनी दिवाळीची ओढ थेट मनामनात।

सरला सण, विरळला उत्साह

मावळले दिवे, संपले सुखद क्षण

पक्षी उडाले घरट्याकडे आपुल्या

फिरून परतेन मी दिला श्वास नवा

दिला श्वास नवा……………..


©पल्लवी उमेश


पल्लवी उमेश