Profile
Join date: Oct 22, 2020
About

ध्येय.....


ध्येयच असते जे जग ओळखायला शिकवते

ध्येयच असते जे 'मी' तला 'स्व' ओळखायला शिकवते

ध्येयच असते जे एका बडबडीला मितभाषी बनवते

ध्येयच असते जे संकटकाळी खरचं आपले कोण हे ओळखायला शिकवते

ध्येयच असते जे सर्व गोष्टींचा खोलात विचार करायला भाग पाडते

ध्येयच असते जे ते गाठण्यासाठी प्रयत्न करायची जिद्द आणते

ध्येयच असते जे सर्व जाणीवांची ओळख करायला शिकवते

ध्येयच असते जे रडणार्‍याला अजुन खंबीर आणि बळकट बनवते

ध्येयच असते जे आयुष्यातील Negativity पुसून Always Positive रहायला शिकवते

ध्येयच असते जे Whatsapp, Facebook ,Hike, Instagram वरून आपोआपच Inactive व्हायला भाग पडते

ध्येयच असते जे Virtual दुनियेपासून आपल्याला आपोआपच Disconnect करते

आणि अखेर,

ध्येयच असते जे अथक प्रयत्नांनंतर यशाच्या उत्तुंग शिखरावरती पोहचवते.....


-क्रांती शेलार (नाशिक)
Kranti Shelar