
Profile
About
प्रेम भावनेवर आजपर्यंत अनेक लेखकांनी कथा, कादंबरी, नाटके, गीते, चित्रपट काढले.तरीही प्रेम भावनेवर लिहिल तेवढं कमीच आहे.प्रेमात जुळलेली नाती घट्ट व्हावीत आणि उत्तरोत्तर घट्ट होत जावीत.हा माझ्या लिखाणाचा हेतू.
प्रेम भावनेवर आत्तापर्यंत पाहिलं, अनुभवलं आणि इतरांकडून समजलं तेच लिहण्याचा प्रयत्न केला आहे.हे सर्व खुलून दिसावं यासाठी कल्पनेचा आधार घेतला आहे.
ज्या अडीच अक्षरांवर साऱ्या जगाचा डोलारा उभा आहे,त्या प्रेमाबद्दल कितीही लिहीलं तरी थोडच... तरीसुद्धा लिहून लिहून उरणारा विषय म्हणजे 'प्रेमच'.
लघु कथा ह्या पुर्णपणे काल्पनिक असुन वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही.जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्टी दिसतही नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही.त्या हृदयातून जाणता येतात, म्हणून लघु कथा सर्वोत्तम करण्याचा माझा प्रयत्न आहे.तो प्रयत्न किती सफल आहे, हे सहृदय वाचक ठरवतील.
'दुसऱ्याचं दुःख पाहिलं कि त्यामानाने आपलं दुःख कमी वाटतं'.असे मला वाटते.
समाज जीवनातील हळव्या भावभावनांचा परामर्श घेऊन,त्या भावभावना प्रवाहित करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न......
_"दि सुभाष"
