विश्व मराठी परिषदेसाठी प्रमुख शहरे, जिल्हा, तालुका इ. पातळीवर उत्साही, उपक्रमशील आणि कार्यक्षम प्रतिनिधी हवेत...

विश्व मराठी परिषदेसाठी  
प्रमुख शहरे, जिल्हे व तालुक्यांकरिता ​प्रतिनिधी नोंदणी 
एका जागतिक पातळीवरील कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थेबरोबर सृजनशील आणि प्रतिष्ठा वाढवणारे  कार्य करायची संधी...

१२ कोटी मराठी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परस्परांशी जोडून घेऊन समर्थ, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी समूह निर्माण करण्यासाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता या निमित्ताने संबंधित विविध क्षेत्रात विश्व मराठी परिषद काम करीत आहे. सर्व प्रकारच्या भेदांपलीकडे वैश्विक विचार करणारा असा समर्थ आणि सक्षम  मराठी भाषिक समाज असावा अशी अपेक्षा आहे.   

विश्व मराठी परिषदेबरोबर देश विदेशातून १० हजाराहून अधिक लोक  जोडलेले आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. तसेच ५ लाखांहून अधिक संख्येने मराठी भाषिक समाज समूह माध्यमांद्वारे  जोडला गेला आहे. ३२ हून अधिक देशात, अमेरिकेतील १२ हून अधिक राज्यात आणि महाराष्ट्राबाहेर भारतात सुमारे  १५ राज्यात विविध उपक्रमांसाठी समन्वयक सहकार्य करीत आहेत.  

 

प्रतिनिधी उत्साही, कार्यक्षम, उपक्रमशील, जबाबदार आणि मनापासून काम करणारे हवेत. ज्यांना आयुष्यात काहीतरी करावेसे वाटते अशांना प्राधान्य दिले जाईल...

अपेक्षा :
१) मराठी साहित्य, संस्कृती व उद्योजकतेविषयक क्षेत्रांमध्ये काम करण्याची आवड हवी.
२) आपल्या परिसरातील विविध प्रकारच्या व्यक्ती आणि संस्था यांच्याशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या संपर्क असावा.
३) समूह माध्यमे आणि संगणक  (व्हॉटसअप, फेसबुक, युट्यूब, ईमेल इ.) वापरता आले पाहिजे. 
४) संयोजनाची आवड
५) सामाजिक कार्याची आवड
६) समन्वयक म्हणून काम करता येणे आवश्यक
७) बोलण्याची, संवादाची आवड हवी, उपक्रमशील असावे
८) अनुभवाची अट नाही
९) वयोमर्यादा - ३० ते ५५ पर्यंत

​अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ३१ ऑगस्ट, २०२० 

प्रतिनिधी नोंदणी अर्ज 

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad