top of page

सामाजिक विषमता



सामाजिक विषमता भारताची ज्वलंत समस्या आहे. भारतात जन्म घेवून, भारतीय नागरिक असून, आपल्याला असं काही आढळून येतं कि वाटतं, हे काय चाललंय आहे?

भिकारी, मजूरवर्ग, सफाई कामगार, घरी काम करणार्‍यां बाई माणसं, ढाबे व चहा च्या टपरी वर काम करणारे लहान मुलं...ही विषमता नाही का? एकाच वेळेस समाजात अति उच्च श्रीमंती पाहिल्या मिळते तर दुसरी कडे त्याच शहरात झोपडपट्टीत राहणारे सामान्य नागरीक!!! दुसरी कडे निम्न जातिनां शिक्षणा पासून वंचित ठेवलं जातं, का म्हणून? ...प्रत्येका ला शिक्षणा चा अधिकार आहे, भारतीय संविधान मधे तसं नमूद आहे, पण ह्या बाबतीत ही समाजात विषमता दिसून येते कि उच्च जाती, निम्न जाती वर वर्चस्व म्हणून दाखिवते, बर्‍याचदा त्यांनचा सामाजिक बहिष्कार केला जातो.

ह्या कोरोना काळात ही आपल्याला सामाजिक विषमता पाहिल्या मिळाली. प्रवासी मजूरवर्ग रात्रंदिवस पाई चालून, उन्हात-गर्मीत...घरी जायला आतुर होता. भूक तहान विसरून ते,किलोमीटर दर किलोमीटर, पाई चालून घरी जायला तत्पर होते. जिथे भूके साठी पैसे नहव्ते, तिथे औषधा चा विचार तर दूरचा.


सामाजिक विषमता अनादि काला पासून सुरूच आहे. रामायणातील शबरी आणि प्रभु श्रीराम ची भेट,सर्वानां माहित आहे.शबरी ला पण त्या वेळेस समाजातून बहिष्कार करण्यात आलं होतं. नंतर दुसरं उदाहरण महाभारतातील, श्रीकृष्ण व सुदामा ची भेट, कुठे एक राजा तर, त्याचा गरीब मित्र सुदामा....सुदामाचे पोहे ही गोष्ट पण सर्वानां माहित आहे. महाभारतातील दुसरं उदाहरण म्हणजे, गुरू द्रोणाचार्या नी एकलव्य कडून, गुरू दक्षिणा म्हणून मागितलेला त्याचा अंगठा...म्हणजे इथे ही शिक्षा व्यवस्था मधे विषमता होतीच, नाही कां?


सतयुगा पासून कलीयुगा पर्यंत ही विषमता आहे. जी एक वास्तविकता आहे.


आज पण आपण पाहतो, सत्ते वर बसलेले, चौथी पास मुख्यमंत्री होतात आणि शिक्षित वर्ग त्यांनच्या हाता खाली काम करतात. देशा मधील ही विषमता जागो जागी पाहायला मिळते. आज स्त्री पण पुरूषांन च्या बरोबरीने समाजात वावरत आहे.तरी पण तिला काही समाजात शिक्षणा पासून वंचित ठेवलं जातं, लहान वयात लग्न लावून दिले जातात, बाल विवाह ही म्हणता येईल. मुलगी जन्माला येणं, त्या परिवारात ती "नकोशी " असते. स्त्रीभ्रूण हत्या पाहायलाच मिळते. घरगुती हिंसाचार, हुंडाबळी सारख्या समस्या समाजात घडतात.


सध्या भारतीय समाज बर्‍याच सामाजिक समस्यां पासून ग्रस्त आहे. ज्याचे निराकरण करण्यासाठी,सरकार आणि समाज संयुक्त पणे प्रयत्न केले जात आहेत. भारतीय समाजा मधे मुख्य समस्यांमधे लोकसंख्येत वाढ, बेरोजगार, असमानता, अशिक्षा, दहशतवाद, भ्रष्टाचार, नशा, हुंडा, बाल विवाह, भ्रूणहत्या, जीवघेणे रोग, घटस्फोट ची समस्या यांचा समावेश आहे. ह्या सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी,त्याचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.


परिवर्तन समाजा चा नियम आहे. जितका समाज गतिमान आणि परिवर्तनशील असेल तितक्याच समस्या निर्माण होतील. वेगवेगळ्या युगात सामाजिक परिवर्तनाचे गति वेगळी होती. सध्या सामाजिक बदल अतिशय वेगाने होत आहे. अश्या प्रकारे बदलत्या आधुनिक समाजाच्या, सामाजिक समस्यांनच निर्मूलन साठी नेहमीच प्रयत्न राहिले पाहिजेत.


"सामाजिक विषमता नष्ट झाली तरच निरोगी समाजाची निर्मिती" , असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केलं आहे, आणि बरोबर आहे. आज आपला देश "भारत" कोरोना संकटावर मात देण्याचा प्रयत्न करित आहे व तसेच आर्थिक संकटाचा ही सामना करित आहे,पण त्याहून ही देश सावरेल, अशी मला खात्री आहे. शासकीय योजनांन वर अवलंबून ना राहता, प्रत्येका ने आपले योगदान दिले पाहिजेत. गाव पातळी पर्यंत विकासांच नियोजन झालं पाहिजेत.


सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी माझ्या मते, "शिक्षण" खूप गरजेचं आहे, त्यामुळे आर्थिक सुबकता येते. गावागावात शिक्षण केंद्र असलेच पाहिजे.शिक्षण पद्धती पण "घोकम पद्धती" नको .त्या केंद्रांन मधे "वोकेशनल ट्रेनिंग" केव्हा "लोकल फार वोकल" सारखे उपक्रम असायला पाहिजेत, जेणेकरून व्यवसाय, लघुउद्योग, ग्रामीण भागा पर्यंत पोहचतील.


प्रत्येक जण काही डाक्टर, इंजिनिअर, साइंनटिस्ट,केव्हा मोठ्या मोठ्या पदव्या घेवून जन्माला येत नाहीत. प्रत्येकालाच परीश्रम करावे लागतात, त्या साठी निती व नियोजन आवश्यक आहे.


ग्रामीण भागात दवाखाने नाहीत. आज भारतात प्रत्येक हजार माणसांवर एक डाक्टर आहे, असं का? आज शहरीकरण होत चाललंय, ग्रामीण भागात सोई नाहीत. सरकार किती ही नियम व कडक कायदे करू दे,तरी पण सर्वानां शहरांत दवाखाणे उभे करायचे असतात, मग आपल्या ग्रामीण भागाचं काय?


ह्या सर्व गोष्टीचं ,विश्लेषण व नीति नियोजन करून प्रयत्न करायला हवे .

सामाजिक विषमता ही राहणारच. हा दुरावा कसा कमी करता येईल, ह्या साठी प्रयत्न करत राहण्याची गरज आहे.


सौ.रश्मि कविश्वर पिंप्रीकर

Female

Jamnagar (Gujarat)

Dt: 18/3/2021

Phone: 8128059820

Email.: pgirish30@gmail.com



ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

1,239 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page