top of page

वैवाहिक जीवन आणि मानसिक आरोग्यनिरोगी असणे म्हणजे केवळ आजारी नसणे असे नसून सुआरोग्याच्या संकल्पनेत शारिरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य हया सर्वांचा समावेश असतो . आपल्याला काही शारीरिक आजार झाला तर आपण वैद्यकिय मदत घेतो.पण मानसिक आजाराकडे मात्र दुर्लक्ष करतो. माणसाचे मन शरीरात कुठे असते हे सांगणे कठीण आहे पण त्याचा अनुभव आपण घेत असतो. मनाचे शरीरावर राज्य चालते आणि मनोबलाच्या ज़ोरावर शारीरिक कमकुवततेवर मात करता येते. मानसिक आज़ाराची विविध लक्षणे दिसून येतात. मानसिक आजारांचे निदान करुन त्यावर उपाययोजना करणे शस्त्राने शक्य झाले आहे.


आपल्या आरोग्याचा आपल्या विविध नातेसंबंधावर परिणाम होत असतात. घरातील एक व्यक्ती आजारी असली तर पूर्ण घरावर त्याचे पड़साद उमटतात.


वैवाहिक नातेसंबंध विविध व्यक्तींमध्ये असतात. शारिरिक वा मानसिक आज़ारामुळे ह्या नात्याला तडा ज़ाऊ शकतो. मुंबई कुटुंब न्यायालयात केलेल्या पनानी नुसार लग्नानंतर पहिल्या वर्षात साधारण पंचवीस टक्के संसार मोड़तात आणि त्याची कारणे पहाता असे लक्षात येते की दहा टक्के जोडप्यांमध्ये शारीरिक आजार आणि तीस टक्के जोडप्यांमध्ये मानसिक आजार त्यांचे संसार मोडायला कारणीभूत ठरली होती.


मानसिक आजराबद्धल आजही समाजात हवी तितकी जागरुकता नाहिए. एकतर हा आजार असून त्यावर उपचार करता येतात हे माहित नसते. आणि उपचार करण्याचे टाळले जाते. लग्नानंतर सूधारेल असा काहीजण विचार करतात आणि लग्न लावून देतात.


आता काही मानसिक आजारांविषयी जाणून घेउया.


चिंता आणि ताण (Anxiety and stress)

ह्यामुळे त्या व्यक्तीमध्ये शारिरीक विकार दिसून येतात. चिंता व ताण सोबत असतात. कुटुंबावर ह्याचे परीणाम दिसून येतात.


ॲाब्सेसिव्ह कम्पलसिव्ह न्युरासीस ( OCD)

साधारण १ टक्का लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. म्हणजेच, मधुमेह किंवा दमा ह्या आजारांइतके हा आजार आढळतो.एखादी गोष्ट परत परत करत रहातात. निटनेटकेपणा असे वरवर बघणार्याला वाटू शकते.पण अश्या व्यक्तीसोबत रहाणे त्रासदायक वाटू शकते. सतत हात धुणे, कुलुप लावल्यावर खूपदा तपासणे, खूप वेळ अंघोळ करत बसणे अश्या बाबींचा कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. त्या व्यक्तीने असे केले नाही तर ती व्यक्ती अस्वस्थ होते.


बायपोलर डिसॲार्डेर

मेनीआ आणि डिप्रेशन हे दोन प्रमूख प्रकार . हा नैराश्याचा प्रकारआहे.मेनिया म्हणजे आतिशय आनंदाने उत्तेजित होणे. तीव्र दु:ख्ख व वैफल्य म्हणजे डिप्रेशन. हया दोन प्रकारात व्यक्ती डोलायमान असते.

बाकिच्यांना ती व्यक्ती लहरी वाटते. कुटुंबातील इतरांना त्यांच्याशी कसे वागावे ह्याचा गोंधळ होतो.


भयगंड ( फोबियाज)

भीती वाटणे हयात काही चूक नाही . पण वाजवीपेक्ष्या जास्त भीती वाटणे जी रोजच्या जीवनात त्रास देते तेव्हा ती आजार बनते.ह्या आजारात वेगवेगळ्या वस्तूंची किंवा ठिकाणांची भीती वाटते.


नैराश्य (डिप्रेशन)

नैराश्य हे शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक कारणांमुळे होऊ शकते.


स्कीझोफ़्रेनिया

व्यक्तीला भ्रम आणि भास होतात जे विसंगत असतात. व्यक्तिचे वागणे, बोलणे असंबध असते.


बॉडी डिस्मोर्फ़िक डिसॉर्डर ( BDD)

शरीराच्या कोणतातरी भागाचे ऑबसेशन असते आणि त्या भागात काहीतरी व्यंग आहे असे वाटते.उदा. त्वचा काळी आहे, कोरडी आहे, नाक लहान आहे. ह्याचे परिणाम मैत्रीवर होतात.आपल्याकडे सौंदर्याला खूप महत्व दिले जाते. त्यामुळे असे वाटल्याने ती व्यक्ती इतरांना भेटणे टाळते.


Adjustment disorders, Acute stress disorders, Post traumatic stress disorders.

एखाद्या घटनेनंतर मनावर ताण येणे.


वरील आजारांवर वैद्यकीय शास्त्रात उपचार आहेत. विवाह करण्या पूर्वी असा आजार असल्यास त्यावर उपचार घ्यावेत आणि त्याची महिती जोदीदाराला विवाह ठरवताना द्यावी.


विवाहानंतर असे आजार होऊ शकतात. आजारी व्यक्तीला समजुन घेणे आणि आधार देणे गरजेचे असते.

परिस्थितीत चढउतार होत असतात .त्या वेळी परिस्थितीला सामोरी जातांना कूटुंबियांची ( प्रामुख्याने जोड़ीदाराची) साथ असली तर खूप सोपे जाते.


आपण एका व्यक्तिविषयी बघितले, पण कुटुंबाचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने प्रयत्न केला पाहिजे. कुटुंबात सगळ्यांना आपले मत मोकळेपणे मांडण्याची संधी मिळावयास हवी. प्रत्येकाचा आदर केला जावा. घरात आनंदी वातावरण असावे.


आपण जर शारिरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याबद्दल सजग राहिलो तर आपले नातेसंबंध निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते.


डॉ. सुजाता मोरेचव्हाण.

ठाणे.

मो: 9867934108

ईमेल: drsujatachavan61@gmail.com


 

ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्ट चे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठी परिषदेच्या ईमेल लिस्ट ला सबस्क्राईब करा.

990 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page