top of page

॥ रानचे पाखरू ॥



रानचे पाखरू , कुणी नका रे हाकारू

रानची ती शोभा , त्याले नका रे नाकारू ॥ धृ ॥


ते मुकं त्याले काय ठाव

तुझा गोफणीच्या पत्थरानं

जाय म्हणून जीव

नको त्याले तू मारु , एक दिस तुले ते तारु

रानचे हे पाखरू कुणी नका रे हाकारू

रानची ती शोभा त्याले , नका रे नाकारू ॥१॥


रानची ही पाखरं , हाय बिचारी

कुणी कैद करु , नका हो पिंजरी

स्वातंत्र्याची गोड फळे त्याले चाखू दया

रानची उघयी हवा त्याले खाऊ दया

रानच्या या मुक्याला उडू दया भिरू - भिरू

रानचे हे पाखरू , कुणी नका रे हाकारू

रानची ती शोभा त्याले नका रे नाकारू ॥२॥


तुले जसा जीव , तसा त्याले जीव

तुले जसा संसार , तसा त्याले संसार

नको आज मंगळाचे , अमंगळ करु

रानचे हे पाखरू , कुणी नका रे हाकारू

रानची ती शोभा , त्याले नका रे नाकारू ॥३||




कवी , गीतकार = अशोक कुमावत

पत्ता - रुम नं .२०१ , सी -१ / ५५ , मेघधारा को. ऑप . हौसिंग सोसा .लिमी , जन . अरूण कुमार वैद्य मार्ग,दिंडोशी डेपोच्या मागे , मालाड ( पूर्व), मुंबई ४०००९७

मो . नंबर = ९९६९५८४९६६

ashokkumawat010@gmail.com



ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा


54 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page