top of page

जल पाण्याचे प्रवचन ,(मुक्तछंद) जलसूक्त.
या पाण्याचे काय ते मोल पाणी आहे अनमोल

तोरण्यावर बेडकीने दावियेला जलसाठा

स्वराज्य तोरण बांधताना तृप्त होई मर्द मराठा

कधी निर्माणक कधी विनाशक

कधी संजीवक कधी आश्वासक

विविध रूपे दिसे पाणी रोज सांगे आकाशवाणीसत्तर टक्के पाणीसाठा घोट प्यायचा अगदी छोटा

या छोट्याला सांभाळाया राजस्थानी झिजविती काया

मोठा खड्डा खणुनि काढती सिमेंट लावुनी स्वच्छ करिती

शुभ्र वसने तोंड बांधिती पाऊस पाणी साठा करिती

वस्त्रगाळ ते पाणी होई तृषार्ताची तहान शमवीज्यांना पाणी खूप मिळते त्यांना त्याची किंमत नसते

मराठवाडा सुके तहाने पाणी वाहे कुठे नळाने

आपुल्या भावी पिढ्यांसाठी पाणी संचय करण्यासाठी

नदीजोड प्रकल्पासाठी सारे शिकुया यारे आता

सजग होऊनि जलसाक्षरतासौ. उमा अनंत जोशी

२३.०३.२०२१.विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

148 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Mar 26, 2021

सार्थ आहे तुमची कविता

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page