एका स्त्रीच्या असण्याने जगात
एक गोष्ट उजागर झाली!
जगासमोर तीच सर्वश्रेष्ठ
हि भूमिका समोर आली!
न थकता , न थांबता आनंदाने
कुठेही उपकाराची भावना नसलेली!
अहंपणा अन कंटाळा कुठलाच नाही
ती सुखी घराची किल्ली असलेली!
घरची ती प्रशासकीय अधिकारी
वेळ पडता डॉक्टर,टीचर,कोन्सिलर असलेली!
घराची गृहमंत्री, वित्त मंत्री ती
थोडक्यात घराचा आधारस्तंभ असलेली!
बघाना जगाची रीतच आहे न्यारी
जून्या काळापासून चालत असलेली!
कुठे न लिहीलेले नियमच आहेत
काळ बदलला तरी "आई" आईचं असलेली!
कपिल राऊत (कवी)
मु. पो. अल्लीपुर जिल्हा वर्धा
Email : kapilraut1234@gmail.com
コメント