• Vishwa Marathi Parishad

क्षमा


क्षमा हा शब्द खरतर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे.एखाद्याने चूक करायची आणि पच्शताप झाला की समोरच्याला क्षमा मागायची. एवढेच आपल्याला माहीत असते. पण कधी कधी क्षमा करून ही समोरची व्यक्ती तो राग विसरलेली नसते. भांडणापेक्षा अबोला बरा म्हणून तिने "केले तुला माफ" अस सांगितलेले असते. त्याच्या बद्दल असलेला राग मात्र मनात तसाच असतो. पण खरतर ज्या व्यक्ती च्या मनात राग असेल, तर ती व्यक्ती कधीच शांत नसते. वर वर बघितले तर एखादे वेळी चूप दिसत असली तरी डोक्यात तेच तेच विचार चक्र सुरू असते. त्यामुळे स्वतःचे शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडवणून बसते, सतत राग राग केल्याने मानसिक परिणाम शरीरावर दिसायला लागतात, नको त्या गोष्टी डोक्यात ठेवल्याने महत्वाच्या गोष्टी च विसरायला होतात. सतत दुसऱ्यांना दोष देण्याचा स्वभाव बनतो. पण आपण ही काहीतरी चुकतो ही गोष्टच त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही......


ठीक आहे समोरच्याची चूक असेल ही परंतु आपण त्याला माफ केलं म्हटल्यावर ते विसरले पाहिजे पण तसे होत नाही,. तसे न झाल्यामुळे सतत चीड चीड करून आपण आपल्यालाच खूप मानसिक त्रास करून घेत असतो. बोलणार बोलून मोकळं झालेलं असतो पण तोच तोच विचार मनात ठेऊन आपण स्वतःला दुखी कष्टी करत असतो.त्यासाठी आतून क्षमा करता येणे खूप महत्त्वाचे असते.कधी कधी तर एखादी व्यक्ती इतकी मोठी चूक करते की त्याला माफ करणे शक्यच नसते पण तरी त्या व्यक्तीला आपण शांत राहून, ध्यान करून डोळ्यासमोर आणले आणि "जा केले तुला माफ" असे मनापासून म्हणून त्याला मनातून काढून टाकले तर ते आपल्यासाठी खूप उपयोगी असतं.


माफ केले म्हणजे असे नाही की आता लगेच त्याच्याजवळ जाऊन बसले आणि गप्पा केल्या .हसी मजा केली. अस केलं तर त्याला त्याची चूक कळणारच नाही.त्याला त्याची चूक तर कळलीच पाहिजे म्हणून त्याच्यापासून लांब राहणेच उत्तम पण आंतरिक क्षमा केल्याने आपल्या मनावर, शरीरावर पडणारा ताण त्यामुळे कमी होतो. त्या विचार चक्रातून आपण स्वतःला सोडवतो. व त्यापुळे नवीन विषय , नवीन काम आपल्याला सुचते व आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते. तसे तर आपल्या आयुष्यात योगा , ध्यान ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या ऋषी मुनींनी दिलेली खूप मोठी शिकवण आहे ही आपल्यासाठी पण ती आपल्याला कशी करायचं हे माहीत नसते आणि त्यासाठी आपल्याला एखाद्या व्यक्ती कडून ते शिकावं लागतं. तसचं ' inner forgiveness' म्हणजे आतून माफ करणे ही पण एक टेक्निक आहे . ती एखाद्या जाणत्या व्यक्तीकडून शिकून घेणे महत्त्वाचे असते. मी स्वतः आता एक सेशन केलं त्यामुळे मला बराच फायदा झाला. खूप गोष्टींची माहिती झाली. ह्या ब्रम्हांडात, ह्या जन्मात किंवा अनेक जन्मात आपण कुणाला दुखावले असेल किंवा आपण कोणाकडून दुखावले गेलो असेल तर ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहचत असते. व आपल्या आयुष्यात शांतता लाभत नाही .ही गोष्ट मला कळली. तसेच निर्जीव वस्तू मध्ये पण ऊर्जा असते व त्याबद्दल आपण सतत काहीतरी वाईट विचार केला तर त्यांच्याकडून सुध्दा आपल्याला तिचं ऊर्जा मिळते. कारण पेराला तेच उगवेल हे आपल्याला माहीतच आहे. आणि त्यामुळे आपलं आयुष्य डिस्टर्ब होतं. म्हणून त्यासाठी .ब्रम्हांडातील प्रत्येक वस्तू,जीव जंतू, निर्जीव वस्तू ह्यांना मनातून माफ करायचे व त्यांची माफी मागायची हे ह्या टेक्निक मध्ये आपल्याला शिकायला मिळते. त्यामुळे मनातील सगळे नकारात्मक विचार निघून जाण्यास मदत होते, व हलके झाल्यासारखे वाटते. मनाला प्रसन्न वाटते. आणि प्रसन्न मन आयुष्यात काहीही करू शकते.


संगीता पाटील

email.psangita92@gmail.com

1,018 views0 comments
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad