top of page

मुखपृष्टांची गोष्ट । रविमुकुल । विश्व मराठी संमेलन २०२१ - विशेष कार्यक्रम


युट्युबवर कार्यक्रम पहा आणि शेअर करा.




विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात या विशेष कार्यक्रमाचा विषय, आशय आणि सादर करणारी व्यक्ती, त्यांचं काम, कला अनुभव आणि त्याचे किस्से सगळं काही विशेष...


पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून आपलं नेमक्या एखाद्याच पुस्तकाकडे लक्ष जातं ते त्याच्या मुखपृष्ठामुळे! बघताक्षणी आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो आणि तेच विकत घेतो त्यालाही कारण असतं त्याचं मुखपृष्ठ! पुस्तकाच्या आशयाच्याही आधी जर पहिल्यांदा आपण प्रेमात पडत असू तर ते ही त्याच्या मुखपृष्ठाच्याच!

वाचक आणि लेखकाचे नातं जुळवून देण्याचं काम हे मुखपृष्ठ करतं आणि या विलक्षण नात्याची पहिली भेट ही वाचकांच्या मनात इतकी कोरली जाते की दुरुनही एखाद्या आवडत्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं की आपल्याला आतल्या सगळ्या पानांत दडलेल्या गोष्टीची सफर घडून येते..


आतल्या पानांमध्ये असलेल्या गोष्ठीप्रमाणेच प्रत्येक मुखपृष्ठाची आपली स्वतःची अशी एक स्वतंत्र गोष्ट असते...

वाचकाला ती गोष्ट माहीत असतेच असं नाही... किंबहुना नसतेच म्हणा...गेली पाच दशके पस्तीसशे हुन अधिक दर्जेदार मुखपृष्ठे साकारणारे मुखपृष्ठकार, ग्रंथासजावटकार, कालिग्राफर, छायाचित्रकार, व लेखक , विश्वास कुलकर्णी अर्थात " रविमुकुल " आपल्याला मुखपृष्ठांमध्ये लपलेल्या याच गोष्टी सांगणार आहेत.




आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...


संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.

537 views0 comments

コメント


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page