top of page

तरूणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग

चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा 

१३ ते १६ जून, २०२३ | संध्या. ८ ते ९

प्रा. क्षितिज पाटुकले
सुप्रसिद्ध लेखक, कल्पक उद्योजक
संस्थापक, विश्व मराठी परिषद

आयोजक

विश्व मराठी परिषद

आजचा प्रत्येक तरुण म्हणजे उद्याचा म्हातारा आहे ! आजच्या तरुणांना त्यांचे एक तृतीयांश आयुष्य ज्येष्ठ नागरिक म्हणून जगावे लागणार आहे. या तरुणांची म्हातारपणातील सर्वात मोठी समस्या म्हणजे भरपूर जगणं ही असणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक आहे रिटायरमेंट प्लॅनिंग अर्थात निवृत्तीनंतरच्या जीवनाचे नियोजन आणि हे नियोजन शक्य तितक्या लवकर म्हणजे पंचविशीत - तिशितच सुरू करायला हवे. पस्तीशी - चाळीशी म्हणजे उशीर होईल आणि पंचेचाळीशी - पन्नाशी म्हणजे खूप खूप उशीर... ! आयुष्याची संध्याकाळ आनंदी करण्यासाठी आयुष्याच्या सकाळी सकाळीच म्हणजे तरुणपणातच गांभीर्याने काळजी घेतली पाहिजे. आले का लक्षात!

जगाचे सरासरी आयुर्मान वेगाने वाढत आहे. आधुनिक वैद्यकीय शास्त्र आणि हॉस्पिटल्समधील सुविधा यामुळे मृत्यूचे वय अधिक होत आहे. अशावेळी दीर्घकाळ - भरपूर मोठे आयुष्य ही एक मोठी समस्या बनणार आहे. सध्या जपान, युरोपियन राष्ट्रे आणि अमेरिकाही या समस्येचा सामना करीत आहे. भारत जरी आज युवकांचा देश असला आणि भारताचे सरासरी आयुर्मान २७ वर्ष असले तरी येत्या पंचवीस - तीस - चाळीस वर्षांनी भारतही म्हातारा होईल. तेव्हा प्रत्येक नागरिकासाठीही वैयक्तिक जीवनात फार मोठ्या समस्या निर्माण होतील. त्यांचा विचार करून त्यासाठी आत्ताच म्हणजे तरुणपणीच नियोजन करणे आवश्यक आहे. हे नियोजन आणि त्यासंबंधीचा विचार प्रत्येकाला करावा लागेल. मग तो गरीब असो का श्रीमंत, नोकरीत असो का व्यावसायिक, स्त्री असो की पुरुष, गृहिणी असो की विद्यार्थी हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. वाढते वय आणि भरपूर जगणे याचबरोबर अजूनही खूप कारणे आहेत तरुणपणीच रिटायरमेंट प्लॅनिंग करण्याची. ती अशी १) कमी होत जाणारी मिळकत ( उत्पन्न ) २) वाढती महागाई ३) कमी होत जाणारे व्याज दर ४) वाढत जाणारा वैद्यकीय खर्च ५) एकत्रित कुटुंब पद्धतीचा ऱ्हास ६) वेगाने वाढणारे शहरीकरण ७) प्रदूषण आणि जागतिक समस्या ८) बदलती जीवनपद्धती ९) गतिमान जीवनशैली १०) पेन्शन नसणाऱ्या नोकऱ्या ११) वाढती कॉस्ट ऑफ लिव्हिंग १२) एकाकी होत जाणारी माणसं.

खरंतर आजच्या तरुणांना त्यांचे एक तृतीयांशहून अधिक आयुष्य जेष्ठ नागरिक म्हणून जगावे लागणार आहे. कारण इस २०२० ते २०५० दरम्यान सरासरी मृत्युदर एक ९० वर्षांहून अधिक असणार आहे ही कार्यशाळा प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. विशेषतः २० ते ५० वयोगटातील लोकांसाठी अधिक उपयुक्त आहे. प्रा. क्षितिज पाटुकले हे जेष्ठ अर्थतज्ञ आपल्याला या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेतील विषय:
१) रिटायरमेंट म्हणजे नक्की काय ? निवृत्ती कधी सुरू होते ? निवृत्तीनंतरचे जीवन कसे असते ? त्यावेळी कोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात ?
२) तारुण्य म्हणजे काय ? तरुणपणाची व्याख्या काय ? तरुणपण कशासाठी असते ? तरुणपणी कसे कोणत्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे ?
३) आजच्या तरुणांपुढची आव्हाने कोणती आहेत ?
४) तरुणांनी करिअर, घर, वाहन, विवाह, मौजमजा यांचा विचार करायचा का म्हातारपणाचा निवृत्तीचा ?
५) तरुणपणीच रिटायरमेंट प्लॅनिंगची गरज का आहे ?
६) रिटायरमेंट प्लॅनिंग आणि संपत्ती नियोजन
७) रिटायरमेंट प्लॅनिंगमधले टप्पे
८) रिटायरमेंट प्लॅनिंगचे मार्ग
९) केंद्र सरकारची प्रत्येकासाठी पेन्शन योजना
१०) वैयक्तिक रिटायरमेंट प्लॅनिंगचा आराखडा कसा तयार करायचा ?
११) अंमलबजावणी करताना येणारे अडथळे
१२) आयुष्याची सुखद सोनेरी संध्याकाळ (म्हातारपण) यासाठी आयुष्याच्या सकाळीच (तरुणपणीच) कोणती काळजी घ्यावी ?

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ ​ 

तज्ञ मार्गदर्शक 

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे  

​सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.   

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ७५०/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page