top of page

शॉर्टफिल्म आणि डॉक्युमेंटरी मेकिंग

चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा 

31 ऑक्टो ते 3 नोव्हे. | संध्या. ८ ते ९

महेश शेंद्रे (प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक, आणि कॅमेरामन, 27 वर्षे मीडिया क्षेत्रात, राष्ट्रीयस्तरावर पारितोषिक विजेते)

आयोजक

विश्व मराठी परिषद

कुणासाठी अधिक उपयुक्त - खरतर सर्वांसाठी ... म्हणजे ज्यांना काही सृजनशील निर्मिती करावयाची अशा सर्वांसाठी आणि सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त कार्यशाळा.... आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती, संस्था, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या गोष्टी, प्रतिष्ठित व्यक्ती, कथा, कादंबरी, परंपरा, रूढी... अशा विविध गोष्टींवर आपण डॉक्युमेंटरी तयार करू शकता, आपण जगातील कोणत्याही विषयांवर लघु चित्रपट बनवू शकता.

शहाण्या आणि हुशार माणसांना सध्याच्या काळात लघुचित्रपट आणि डॉक्युमेंटरी निर्मिती मध्ये चांगली संधी आहे...कारण तंत्रज्ञान खूप सोपे झाले आहे... शॉर्टफिल्म / डॉक्यूमेंटरी / रील्स कशी बनवावी ?

आजचं युग हे डिजिटल युग आहे. माहितीचे वेगवान आदानप्रदान हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी अत्यंत सोपं असं तंत्रज्ञान आता उपलब्ध झालं आहे. पूर्वी कॅमेरा, फिल्म, व्हिडिओ कॅमेरा ही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती. मात्र आता डिजिटल क्रांतीने सर्व काही सोपे झाले आहे आणि प्रत्येकाच्या हातात आले आहे. स्मार्ट फोनने एक विलक्षण क्रांती केली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि यूट्यूबने आपल्याला संपर्काची आणि वितरणाची असंख्य दालने उघडून दिली आहेत. मात्र हे सर्व जरी खरे असले तरी बेसिक कौशल्य आवश्यक असते. यंत्रे आणि तंत्रज्ञान जरी सोपे आणि सहज उपलब्ध असले तरी ते कसे हाताळायचे ते कळणे आवश्यक असते. विविध माध्यमातून शॉर्ट फिल्म्स कशा बनवायच्या, डॉक्यूमेंटरी कशी तयार करायची, रेकॉर्डिंग कसे करायचे, एडिटिंग कसे करायचे, युजर्स कसे अॅड करायचे यासंबंधी बेसिक कौशल्ये सांगणारी ही एक विशेष कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केली आहे. आपल्याला आपल्या शॉर्ट फिल्मद्वारे जो अचूक संदेश द्यायचा आहे त्याचा आकृतीबंध कसा तयार करायचा ? त्याची स्क्रिप्ट कशी तयार करायची, लोकेशन कसे शोधायचे, कलाकार, आवाज, संगीत कसे व कोणते वापरायचे ? कोणती एडिटिंग सॉफ्टवेअर वापरायची, कोणती ऑनलाइन उपलब्ध आहेत ? कोणती सशुल्क आणि कोणती निःशुल्क आहेत इ. सर्व बाबींविषयी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक आणि कॅमेरामन महेश शेंद्रे या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. गेली २७ वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.

कार्यशाळेतील विषय
1) शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म आणि फिल्म ( चित्रपट ) म्हणजे काय आणि यातील फरक
2) डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म यातील विषय, आशय कालावधी व प्रकार
3) फिल्म मेकिंग स्टेप्स -
प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन.
4) फोटोग्राफी किंवा शूटिंग करण्याचे दहा मूलभूत सिद्धांत.
5) कॅमेऱ्याचे विविध शूटिंगचे अँगल आणि शूटिंगची स्टाईल
6) एडिटिंग ही प्रक्रिया काय आहे ?
7) एडिटिंग साठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर व प्रत्यक्ष एडिटिंग.
8) डॉक्युमेंटरी फिल्म शॉर्ट फिल्म आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये असलेली करिअरची संधी ?

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ ​ 

तज्ञ मार्गदर्शक 

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे  

​सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.   

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ७५०/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page