top of page

तरूणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग

चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा 

29 जुलै ते 1 ऑगस्ट | संध्या. 8 ते 9

प्रा. क्षितिज पाटुकले (ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक, व्याख्याते)

आयोजक : विश्व मराठी परिषद

आजचा प्रत्येक तरुण म्हणजे उद्याचा म्हातारा आहे ! आजच्या तरुणांना त्यांचे एक तृतीयांश आयुष्य ज्येष्ठ नागरिक म्हणून जगावे लागणार आहे. या तरुणांची म्हातारपणातील सर्वात मोठी समस्या म्हणजे भरपूर जगणं ही असणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक आहे रिटायरमेंट प्लॅनिंग अर्थात निवृत्तीनंतरच्या जीवनाचे नियोजन आणि हे नियोजन शक्य तितक्या लवकर म्हणजे पंचविशीत - तिशितच सुरू करायला हवे. पस्तीशी - चाळीशी म्हणजे उशीर होईल आणि पंचेचाळीशी - पन्नाशी म्हणजे खूप खूप उशीर... ! आयुष्याची संध्याकाळ आनंदी करण्यासाठी आयुष्याच्या सकाळी सकाळीच म्हणजे तरुणपणातच गांभीर्याने काळजी घेतली पाहिजे. आले का लक्षात!

◻️कार्यशाळेतील विषय:
✅ रिटायरमेंट म्हणजे नक्की काय ? निवृत्ती कधी सुरू होते ? निवृत्तीनंतरचे जीवन कसे असते ? त्यावेळी कोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात ?
✅ तारुण्य म्हणजे काय ? तरुणपणाची व्याख्या काय ? तरुणपण कशासाठी असते ? तरुणपणी कसे कोणत्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे ?
✅ आजच्या तरुणांपुढची आव्हाने कोणती आहेत ?

✅ तरुणांनी करिअर, घर, वाहन, विवाह, मौजमजा यांचा विचार करायचा का म्हातारपणाचा निवृत्तीचा ?
✅ तरुणपणीच रिटायरमेंट प्लॅनिंगची गरज का आहे ?
✅ रिटायरमेंट प्लॅनिंग आणि संपत्ती नियोजन
✅ रिटायरमेंट प्लॅनिंगमधले टप्पे
✅ रिटायरमेंट प्लॅनिंगचे मार्ग
✅ केंद्र सरकारची प्रत्येकासाठी पेन्शन योजना
✅ वैयक्तिक रिटायरमेंट प्लॅनिंगचा आराखडा कसा तयार करायचा ?
✅ अंमलबजावणी करताना येणारे अडथळे
✅ आयुष्याची सुखद सोनेरी संध्याकाळ (म्हातारपण) यासाठी आयुष्याच्या सकाळीच (तरुणपणीच) कोणती काळजी घ्यावी ?

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक 

✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

✅ ​सर्व सहभागीना प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.   

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. 750/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page