मोबाईल पत्रकार बना
चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा
२० ते २३ जून | संध्या. ८ ते ९
भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार
आयोजक
विश्व मराठी परिषद

आपली आणि आपल्या परिसरातील बातमी थेट वृत्तपत्रांच्या / नियतकालिकांच्या / दूरचित्रवाहिन्यांच्या संपादकीय विभागाकडे पाठवा...
युवक युवतींना आणि लिहू शकणाऱ्या प्रत्येकाला सुवर्णसंधी...
आजच्या काळात तंत्रज्ञानाने केलेल्या अभूतपूर्व क्रांतीचा आपण सतत अनुभव घेत आहोत. मीडिया क्षेत्रातही तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. तुमचा मोबाईल ( स्मार्ट फोन ) म्हणजे आता तुमची लेखणी, तुमचा व्हिडिओ कॅमेरा आणि तुमची बातमी वाहून नेणारा स्त्रोत बनला आहे.त्यातून तुम्हाला संधी निर्माण होत आहेत. तेव्हा तुम्ही सुद्धा बनू शकता पत्रकार... तुम्ही ग्रामिण भागातील असा, तालुक्याच्या ठिकाणी असा किंवा निमशहरी - शहरी भागातील असा... तुम्हाला पत्रकार बनता येईल... पूर्णवेळ किंवा अर्धवेळ पत्रकारितेचा व्यवसाय करता येईल..
कार्यशाळेतील विषय:
१. मीडिया म्हणजे काय ?
२. मीडिया कशा प्रकारे काम करतो ?
३. मीडियाचे प्रकार
४. बातमी म्हणजे काय ?
५. बातमी लेखन : तंत्र आणि मंत्र
६. बातमी कशी पाठवायची ?
७. बातमी सोबत फोटो कसे, किती, कोणत्या साईजमध्ये पाठवायचे ?
८. व्हिडिओ बातमी ( बाईटस ) म्हणजे काय ?
९. मोबाईलवर बाईट कशी तयार करायची
१०. बातमीवर संपादन प्रक्रिया कशी होते ?
११. बातमीदार, पत्रकार आणि संपादक
१२. स्वत:चे स्थानिक न्यूज चॅनेल कसे तयार करायचे ?
१३. आपल्या परिसरात मीडिया सेवा कशी देता येईल ?
१४. इंडियन न्यूज पेपर सोसायटी
१५. प्रसार माध्यमे कायदा आणि सुविधा,
१६. फ्री लान्स – मुक्त पत्रकार म्हणजे काय ? इ.
✅
✅ तज्ञ मार्गदर्शक
✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✅ सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र
सुचना:
1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा.
3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअॅप: 7066251262
विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.