top of page

कवितालेखन सादरीकरण

चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा 

६ ते ९ एप्रिल | संध्या. ८ ते ९

राजन लाखे ? (सुप्रसिद्ध कवी, गीतकार)

आयोजक

विश्व मराठी परिषद

कविता लेखन ही एक अद्भुत अनुभूती आहे. कवितेचा जन्म होणे ही प्रतिभेची एक विलक्षण अशी प्रक्रिया आहे. कुठलीतरी एक अनामिक ईश्वरी म्हणा किंवा दैवी म्हणा किंवा अजून काही तरी म्हणा. पण अशी एक शक्ती संवेदनशील मनाला स्फूर्ती देते, प्रेरणा देते आणि त्यातून कवितेचा जन्म होतो… ती प्रेम कविता असो की विरह गीत, देशप्रेमाचे गीत असो की वात्सल्यपूर्ण अभिव्यक्ती असो, उपहास, विडंबन गीत असो की एखादी दर्दभरी वेदना मांडणारी कविता असो… ती जन्माला येताना कवीला रक्तबंबाळ करून सोडते. अर्थात कवितेच्या जन्मानंतर होणारा आनंदही अलौकिक असतो. आपल्या हातून काहीतरी निर्मिती झाली आहे अशा जाणिवेनंतर निर्माण होणारी पोकळी आणि अंतर्बाह्य व्यापून राहणारी हुरहूर… हीच तर कवीची खरी कमाई असते. कविता म्हणजे केवळ यमके जुळवणे नव्हे किंवा आपल्या भावना, विचार केवळ शब्दबद्ध करणेही नव्हे..
हल्ली आपण नवोदित कवींच अमाप पीक आलेलं पाहतो. पण त्यातून सर्वजण पुढे का जात नाहीत ? का नामवंत होत नाहीत ? कारण त्यांना कविता लेखनाचे तंत्र आणि मंत्र माहित नसते. कवितेचा अंकुर कसा फुलवायचा आणि तिला कशाप्रकारे प्रस्तुत करायचे याची कल्पना आणि त्याचे शास्त्र त्यांना माहित नसते. कवितेचे सादरीकरण हे सुद्धा एक तंत्र आहे. कवितेतील शब्दांबरोबरच हावभाव, देहबोली, शब्दफेक आणि स्वरसंस्कार या गोष्टीही आवश्यक असतात.
विश्व मराठी परिषदेने याचसाठी कविता लेखन आणि सादरीकरण ही ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये नामवंत आणि प्रतिथयश कवी आपल्याबरोबर संवाद साधतील आणि कवितालेखनाचे मर्म उलगडून दाखवतील. त्यातूनच तुमच्यातील कवी खऱ्या अर्थाने विकसित होईल आणि तो कवी संमेलने, मैफिली, सोशल मीडिया गाजवू शकेल. स्वतःच्या कवितांचे यूट्यूब चॅनेलही काढता येईल.

कार्यशाळेतील विषय
१) कवितेचा इतिहास
२) कवितेचे प्रकार
३) कविता तंत्र आणि मंत्र
४) कवितेचे सौंदर्य
५) प्रतिमा, प्रतिक आणि रुपक, इ
६) प्रसिध्द कवी आणि त्यांची वैशिष्टे
७) कविता आणि गजल
८) कविता आणि गाणं
९) कविता आणि विडम्बन
१०) कविता सादरीकरण कला

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ ​ऑनलाईन लाईव्ह मार्गदर्शन - रेकॉर्डिंग शेयर केले जाईल 

तज्ञ मार्गदर्शक 

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे  

​सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.   

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ७५०/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page