कादंबरीलेखन
चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा
२ ते ५ मे | संध्या. ८ ते ९
राजेंद्र खेर
आयोजक
विश्व मराठी परिषद

कादंबरी लेखन हा एक अत्यंत विलक्षण असा लेखन प्रकार आहे. लेखकाची प्रतिभा कादंबरी लेखनामध्ये व्यक्त होते. कादंबरीमध्ये जो विषय हाताळायचा आहे त्याचा सर्वकष अभ्यास करणे आवश्यक आहे. कादंबरी लेखनाचे एक विशिष्ठ असे तंत्र आणि मंत्र आहे. आपल्या मनातील विषयाचे आणि कल्पनेचे कादंबरीमध्ये रूपांतर करताना आधी त्याचा आकृतीबंध रेखाटने हे खूप आवश्यक असते. कारण तोच त्याचा गाभा असतो. त्याच प्रमाणे कादंबरीमध्ये येणारे प्रसंग, मुख्य पात्रे, त्यांचे एकमेकातील संबंध, त्यातील उत्कटता आणि भावबंध, पात्रांचे संवाद, भौगोलिक आणि इतर परिस्थिती यांचा साकल्याने विचार करायला लागतो. कादंबरी लेखन ही एक कला आहे तसेच ते एक शास्त्रही आहे तिचा बाज कसा सांभाळतो यावर कादंबरीचे यश अवलंबून आहे.
कोणताही मोठा लेखक जोपर्यंत कादंबरी लिहीत नाही आणि जोपर्यंत त्याची कादंबरी गाजत नाही तोपर्यंत त्याची गणना यशस्वी लेखकांमध्ये होत नाही. अनेकांकडे कादंबरीसाठी अनेक विषय असतात पण ते फुलवायचे कसे आणि त्यांची कादंबरी कशी करायची याचे तंत्र त्यांना अवगत नसते. विश्व मराठी परिषदेने मुद्दाम कादंबरीलेखन कसे करावे? ही कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये यशस्वी कादंबरीकार आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन करतील. त्यातून तुम्हीही यशस्वी कादंबरीकार बनू शकाल.
१) कादंबरीचा जन्म कसा होतो ? लेखनबीज, संकल्पना, अभ्यास, पूर्वतयारी
२) कादंबरी लेखनाचे प्रकार
४) विषय निवड
५) निवेदन पद्धती
६) कादंबरीचा आकृतिबंध
७) संवाद लेखन, वातावरण निर्मिती
८) कादंबरी प्रकाशित करण्यापूर्वी
९) क्रमशः कादंबरी
१०) ऑनलाईन कादंबरी
✅ ऑनलाईन लाईव्ह मार्गदर्शन - रेकॉर्डिंग शेयर केले जाईल
✅ तज्ञ मार्गदर्शक
✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✅ सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र
सुचना:
1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा.
3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअॅप: 7066251262
विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.