top of page

आर्य चाणक्य अभ्यासवर्ग

21 ते 30 जानेवारी | संध्या.8 ते 9

डॉ. अजित आपटे (शिवचरित्र संशोधक-अभ्यासक- लेखक, शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन विषयावर शेकडो व्याख्याने, व्यवस्थापक – जाणता राजा महानाट्य)

चाणक्यसूत्रे आत्मसात करा... चाणक्यतंत्र अमलात आणा...
🚩आर्य चाणक्य अभ्यासवर्ग - विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रम (ऑनलाईन)

📍संकट असलेल्या आणि नसलेल्याही काळासाठी मार्गदर्शक... आपणा प्रत्येकाला जीवनात यशस्वी होण्यासाठीचे तंत्र आणि मंत्र... चाणक्य नीती

🌀आचार्य चाणक्य अर्थात कौटिल्य... ज्याने अक्षरशः शून्यातून साम्राज्य उभे केले... सर्व प्रकारची प्रतिकूल परिस्थिती... चारही बाजूला शत्रूच शत्रू... अशावेळी अफाट जिद्दीने, अदम्य साहसाने आणि दुर्दम्य आत्मविश्वासाने आचार्यांनी अत्याचारी नंदकुळाचा नाश केला आणि चंद्रगुप्ताला सम्राट पदी पोहोचवले...

ही अशा एका माणसाची गोष्ट आहे ज्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले ! नेतृत्व कलेचा गुरु, एक रणनीतीकार, एक राष्ट्रवादी शिक्षक, एक महागुरु, एक विद्वान, एक लेखक ! होय, आपण चाणक्याची गोष्ट ऐकणार आहोत, त्यांचा अभ्यास करणार आहोत, ज्याने भारत राष्ट्राचे पुनरुत्थान केले, त्याच्याच प्रगल्भ, परिपूर्ण विचारधारेतून आपल्या जीवनात यशस्वी होण्याचा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी बहुमूल्य मार्गदर्शन...

आपल्यालाही जीवनात हरघडी अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते अनेकदा आपण निराश होतो खचून जातो प्रयत्न सोडून देतो कारण आपण चाणक्य नीतीचा अभ्यास केलेला नसतो चाणक्य सूत्रांचा अभ्यास केलेला नसतो... आर्य चाणक्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या 'अर्थशास्त्र' या अभिजात ग्रंथातून अशी तंत्र मिळतील... ज्यातून आपण कुठल्याही अडचणींवर मात करून होऊ विजयी !

✅ या अभ्यासक्रमातून विद्यार्थी काय शिकतील ?
▪️प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थितीत कसे बद‌लावे ?
▪️साम, दाम, दंड, भेद का व कसे ?
▪️दृढनिश्चयाचे फायदे
▪️भारतीय ज्ञान परंपरेचे फायदे
▪️माहितीचे संकलन व विश्लेषण
▪️संपर्क यंत्रणेची निर्मिती व व्यावहारिक उपयोग
▪️आपल्या शत्रूचा तिरस्कार का करू नये ?
▪️माणसाचे अंतस्थ शत्रू कोणते ?
▪️ 24 चा नियम काय असतो ?
▪️ सेनापती आणि सारथी या जोडीचे महत्व काय?
▪️ बुद्धिबळाचे (चतुरंग) महत्त्व व उपयोग? त्यात राखीव खेळाडू का नसतो
▪️पूर्वपक्ष आणि उत्तर पक्षाचं महत्त्व ?
▪️विजिगीषू म्हणजे काय? तो कसा व्हावे ?
▪️ दैनंदिन रणनीती म्हणजे काय?
▪️ मंत्रशक्ती, प्रभूशक्ती, उत्साहशक्ती कशी वाढवावी ?
▪️एकटा माणूस काय करू शकतो ?
▪️ आत्महत्त्येला 'अर्थशास्त्र' का नाकारते?
▪️ आयुष्याच्या लढाईसाठी दहा उत्तम मंत्र

🔶 अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :
✔️ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✔️ऑनलाईन वर्ग – Zoom द्वारे
✔️सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार
✔️सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र

अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक 

✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

✅ ​सर्व सहभागीना प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. 1200/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page