Covid-19 Mahajagar

२५ मे रोजी जगभरातील मराठी भाषिकांचा एकाच वेळी

४२ देशातून, अमेरिकेतील २१ राज्यातून आणि

महाराष्ट्रासह भारतातील १२ राज्यातून  एकाच वेळी मराठी भाषिकांचा कोविड -१९ महाजागर...

कोविड -१९ महामारीमध्ये जगभरातील मराठी भाषिक एकत्र आले असून दि. २५ मे २०२० रोजी ते  सोशल मीडियावर कोविड - १९ महाजागर करणार आहेत. विश्व मराठी परिषदेच्या या अभिनव  उपक्रमाचे नेतृत्व बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकाच्या अध्यक्षा विद्या जोशी करीत आहेत. जगातील तब्बल ४२ देशातील, अमेरिकेतील २१ राज्यातील आणि महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यातील मराठी भाषिकांचे प्रतिनिधी यासाठी एकत्र आले आहेत.

Covid19Jagar Earth.png
#Covid19Jagar ही हॅशटॅग ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम वर वापरुन पोस्ट करा.
विश्व मराठी परिषदेशी जोडून घ्या...

Thanks for submitting!

महाजागराचा व्हिडिओ पहा आणि शेअर करा

कोविड - १९ विषयी मानसिक आणि भावनिक आरोग्याबरोबर शैक्षणिक जागृती असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. २५ मे रोजी हा जागृती संदेश ४२ देश, अमेरिकेतील विविध राज्ये. भारतातील विविध राज्ये आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमधून एकाच दिवशी लाखो लोक अपलोड आणि शेअर करतील आणि पुढील ७२ तासात तो जगभर मोठ्या प्रमाणावर पाठवला जाईल. किमान एक कोटी मराठी भाषिकांनी या महाजागरामध्ये सहभागी व्हावे या पद्धतीने जगभरातील विश्व मराठी परिषदेचे समन्वयक कार्यरत आहेत. 

कोविड – १९ जगभर थैमान घातले आहे. एक अनाकलनीय, भीषण आणि भयकंपित परिस्थितीतून संपूर्ण जग जात आहे. जगभरातील मराठी भाषिक या प्रसंगी एक असून ते एकमेकांना मानसिक आधार देत आहेत, धीर देत आहेत, जागृती निर्माण करीत आहेत, अनुभवांची देवाणघेवाण करीत आहेत, गप्पा मरीत आहेत, लिखाण करीत आहेत, कविता लिहित आहेत, सृजनशील निर्मिती करीत आहेत, आपल्या भावनांना वाट करून देत आहेत, मन मोकळ करीत आहेत आणि धीराने या महाभयंकर संकटाचा सामना करीत आहेत. मुख्य म्हणजे हे सर्वजण सर्वसामान्य मराठी लोक आहेत. यात कोणी सेलिब्रिटी नाही कि राजकारणी नाही. सामान्य माणसांनी एकत्र येऊन एकमेकांना दिलेला मानसिक आणि भावनिक आधार असे या महाजागराचे स्वरूप आहे. कोविड – १९ महामारी विरोधी लढताना शारिरीक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य राखणे विशेष जिकिरीचे काम झाले आहे. अशावेळी जगभरातील मराठी बांधवांचे ऐक्य, बंधुभाव आणि संवाद यांचा अभूतपूर्व अविष्कार एक आगळावेगळा आदर्श निर्माण करेल. विशेष म्हणजे या उपक्रमाद्वारे कोविड – १९ काळातील जगभरातील मराठी बांधवांच्या संवादाचे एक महत्त्वपूर्ण असे दस्ताऐवजीकरण ( Documentation )  होईल.

युनायटेड नेशन्स – युनो आणि युनेस्को जगभरातील स्थानिक भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देत आहे.  अशावेळी या उपक्रमाचे जागतिक पातळीवर अधिक महत्त्व आहे. एखाद्या भाषिक समूहाने जगभरातून एकत्र येऊन अशाप्रकारे संवेदनशिलतेचा आणि एकत्वाचा एकाच वेळी महाजागर करायचा आणि सामुहिक मानसिक, भावनिक आरोग्याला बळ द्यायचे ही जगातील क्रांतिकारी घटना असेल.

जगभरातील विविध देशातील महाराष्ट्र मंडळे, सांस्कृतिक मंडळे, मराठी समाज संस्था, मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धन संस्था, मराठी कट्टे, इ. संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. अमेरिकेतील आर्सि फाऊंडेशनने यासाठी विशेष सहाय्य देऊ केले आहे.