top of page

चलो बीएमएम 2022...!

बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२२

११ ते १४ ऑगस्ट,२०२२
अटलांटिक सिटी, न्यू जर्सी

आयोजक : विश्व मराठी परिषद

istockphoto-1161499220-612x612.jpg

मोठी स्वप्ने बघणाऱ्या आणि अटकेपार झेंडे लावू इच्छिणाऱ्या मराठी बांधवांसाठी विश्व मराठी परिषदेचा अनोखा उपक्रम...

चलो बीएमएम २०२२ - बृहन महाराष्ट्र मंडळ, अमेरिका अधिवेशन...

चलो अटलांटिक सिटी, न्यूजर्सी, अमेरिका - ११ ते १४ ऑगस्ट २०२२


विश्व मराठी परिषदेच्या डेलिगेशन सोबत सहभागी व्हा !
एका अभूतपूर्व अनुभवाचे साक्षीदार व्हा...!
यशाची नवंनवीन शिखरे पादाक्रांत करा...!
सोबत मिनी अमेरिका दर्शन टूर... !

डेलिगेशनमध्ये नाव नोंदवण्यासाठी अखेरची तारीख - ३० मे २०२२ 

विश्व मराठी परिषद ही आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखली जाते. कोरोना काळात सगळे जग घरात अडकून पडलेले असताना परिषदेने जानेवारी २०२१ मध्ये पहिले ऑनलाईन विश्व मराठी संमेलन यशस्वीरीत्या आयोजित केले. या संमेलनाच्या निमित्ताने जागतिक पातळीवरच्या मराठी बांधवाना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र आणण्याची किमया परिषदेने करून दाखवली. या संमेलनात महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तसेच भारताबाहेरील ४२ देशांतील महाराष्ट्र मंडळे सामील झाली होती आणि देश विदेशातील सुमारे २,७२,००० बांधवांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला होता. या संमेलनाची एक सहयोगी संस्था होती अमेरिकेतील सुप्रसिद्ध बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM).  

बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका ही अमेरिकेतील ५९ मराठी मंडळांची एक शिखर संस्था आहे.   दर दोन वर्षांनी अमेरिकेमधील मराठी बांधवांसाठी ती एक अधिवेशन ( BMM Convention ) आयोजित करते. यावर्षीचे बृहन महाराष्ट्र मंडळाचे (बीएमएम) २० वे कन्वेन्शन ११ ते १४ ऑगस्ट, २०२२ रोजी अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील अटलांटिक सिटी येथे संपन्न होणार आहे. साधारतः ५००० हून अधिक अमेरिकेतील सुस्थापित मराठी बांधव (डॉक्टर, इंजिनीअर, आर्थिक सल्लागार, वकील, बुद्धीजीवी, कॉर्पोरेट अधिकारी, उद्योजक आदि ) यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. हे कन्वेन्शन संपन्न होण्यासाठी अमेरिकेतील ५९ मराठी मंडळे आणि हजारो मराठी बांधव सक्रियपणे कार्यरत आहेत. 

 

बीएमएम कन्वेन्शन हा केवळ साहित्य मेळावा नसून त्यामध्ये अमेरिकेतील आणि जगभरातील नामवंत मराठी शास्त्रज्ञ,  उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण तज्ञ, विद्वान, समाजसेवक, साहित्यिक, कलाकार, अभिनेते, इ. विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष निमंत्रण असते. त्याचप्रमाणे गायन, नृत्य, कीर्तन, तसेच नाट्यप्रयोग इ. सादर केले जातात. अधिवेशनामध्ये एक दिवस विशेष बिझनेस समिट आयोजित केले जाते. याबरोबर विविध नाविन्यपूर्ण उत्पादने / प्रोडक्टस / सेवा उद्योग / स्टार्ट अप्सचे स्टॉल्स उभारले जातात. अधिवेशनामध्ये सलग चार दिवस अमेरिकेतील आर्थिकदृष्ट्या सक्षम मराठी बांधव भेट देत असतात. यामध्ये वैयक्तिक भेटीगाठी, कल्पनांची, प्रकल्पांची आणि विचारांची देवाणघेवाण होत असते. यातून अनेक संधी उपलब्ध होतात. नवीन कल्पनांना व्यासपीठ मिळते. मोठ्या प्रमाणात परिचय आणि परस्पर संबंध दृढ होण्यासही मदत होते. त्यातून पुढील संधी व प्रगतीची कवाडे खुली होतात. एक वैश्विक दृष्टिकोनही तयार व्हायला मदत होते.

 

बीएमएम अधिवेशन २०२२ मधील सहभाग कुणासाठी अधिक उपयुक्त आहे ? - खरतर ज्यांना शक्य आहे अशा सर्वांसाठी... विशेषतः उद्योजक, लघुउद्योजक,  व्यावसायिक, स्टार्ट अप्स, महिला उद्योजक, कारागीर,  विविध क्षेत्रातील सल्लागार, आयुर्वेदिक व स्पेशालिस्ट डॉक्टर, इंजिनिअर, विविध सेवा पुरवठादार, ज्योतिषी, चित्रकार, गायक, वादक, कलाकार, अभिनेते, लेखक, प्रकाशक, वक्ते, समाजसेवक, महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था - शाळा - मंदिरे - सामाजिक - धार्मिक संस्था यांचे संचालक ट्रस्टी, प्रगतिशील शेतकरी, ग्रामिण कलाकार, शाहिर, कीर्तनकार, कल्पक युवा, विशेष कौशल्ये असणाऱ्या व्यक्ती, गृहनिर्माण प्रकल्प, जमिनी विकसित करणारे व्यावसायिक, कंत्राटदार आणि अगदी विद्यार्थ्यांना सुध्दा सर्वांना संधी आहेत.


बीएमएम अधिवेशनामध्ये सहभागी झाल्यामुळे कल्पनेच्या पलीकडे प्रगती झालेली अनेक उदाहरणे आहेत. १७ व्या अधिवेशनामध्ये मुंबईतील एक युवा ज्वेलर्स सहभागी झाला होता. त्याने तीन वर्षात मुंबई बरोबरच विदेशात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आणि अमेरिकेमध्ये ५००० स्क्वे. फू. चे शोरूम सुरू केले. डल्लास बीएमएम अधिवेशनात एका भगिनीने नक्षीदार ब्लाऊजचा स्टॉल लावला आणि आता तिचा व्यवसाय साता समुद्रापार विस्तारला आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. 

 

बीएमएम अधिवेशनाबरोबर ७ दिवसांची मिनी अमेरिका टूर आयोजित केली आहे. यामध्ये आपण वॉशिग्टन डी.सी., फिलाडेल्फिया, न्यूयॉर्क याचबरोबर जगप्रसिद्ध नायगरा धबधब्यालाही भेट देणार आहोत. ९ ऑगस्टला मुंबईहून निघून २१ तारखेला मुंबई येथे परत आगमन असे याचे ढोबळमानाने स्वरूप आहे. ज्यांना फक्त बीएमएम २०२२ अधिवेशनामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांना फक्त अधिवेशनामध्ये सहभागी होता येईल. 


  • विश्व मराठी परिषद प्रतिनिधी मंडळ - बीएमएम अधिवेशन २०२२ भेट : अपेक्षित खर्चाची माहिती

पॅकेज अ ) बीएमएम अधिवेशन २०२२ ( बिझनेस समिटसह ) : 

४ रात्री, ६ दिवस  - रु. १,७५,०००/-  + USD ५००  म्हणजे सुमारे रु. २,१५,०००/- ( व्हिसा नसल्यास रु. १६,५००/- अधिक) यामध्ये मुंबई ते मुंबई विमानप्रवास, एअर पोर्ट ट्रान्स्फर, अधिवेशन स्थळाजवळ निवास, ट्वीन / फोर पर्सन्स शेअरिंग राहण्याची व्यवस्था, ब्रेकफास्ट आणि डिनर, USD 50,000 ओव्हरसीज मेडिकल इन्शुरन्स इ. खर्च समाविष्ट आहे.

बी.एम.एम. अधिवेशन, २०२२ - प्रवास कार्यक्रम : डाउनलोड करा

पॅकेज ब ) बीएमएम अधिवेशन २०२२ ( बिझनेस समिटसह ) आणि ७ दिवसांची मिनी अमेरिका टूर ( फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन डी.सी., नायगारा फॉल्स, न्यूयॉर्कसह ) : 
 
१० रात्री, १२ दिवस -  रु. २,२५,०००/-  + USD १५०० म्हणजे सुमारे रु. ३,४०,०००/- ( व्हिसा नसल्यास रु. १६,५००/- अधिक ) 

यामध्ये मुंबई ते मुंबई विमानप्रवास, एअर पोर्ट ट्रान्स्फर, अधिवेशन स्थळाजवळ निवास, अधिवेशनानंतर लक्झरी बसने मिनी अमेरिका टूर, ट्वीन / फोर पर्सन्स शेअरिंग राहण्याची व्यवस्था, ब्रेकफास्ट आणि डिनर, USD 50,000 ओव्हरसीज मेडिकल इन्शुरन्स इ. खर्च समाविष्ट आहे. 

बी.एम. एम. अधिवेशन, २०२२ आणि  युएस ईस्ट कोस्ट  टूर - प्रवास कार्यक्रम : डाउनलोड करा

# अत्यंत महत्वाचे # 
१) अमेरिकन व्हिसासाठी विशेष सहाय्य उपलब्ध केले आहे. मात्र यु.एस.ए. व्हिसा मिळणे पूर्णतः अमेरिकन दुतावासावर, तुमची मुलाखत, आर्थिक क्षमता दर्शवणारे पुरावे आणि इतर कागदपत्रे यांच्यावर अवलंबून आहे. 
२) व्हिसा १००% मिळेल अशी कोणतीही खात्री देता येणार नाही. 
३) सतत अस्थिर असणाऱ्या विमानप्रवासाच्या किंमतीमुळे एकूण रक्कम ५ ते १०% कमी-अधिक होण्याची शक्यता आहे याची कृपया नोंद घ्यावी. 
४) सर्व प्रकारच्या तक्रारी, दावे यासाठी न्यायालयीन प्रक्रियेची सीमा, पुणे शहर न्यायालयीन क्षेत्र ही राहील. 

  • नोंदणी कशी करावी ?

१) नोंदणी करताना नोंदणी फॉर्म, व्हिसा अर्जासाठीची सर्व कागदपत्रे, फोटो आणि रु. ५०,०००/- एवढी रक्कम भरावी लागेल.

२) व्हिसासाठी सर्व प्रकारचे साहाय्य केले जाईल. व्हिसा न मिळाल्यास रु. १०,०००/- एवढी रक्कम वजा करून रु. ४०,०००/- एवढी रक्कम परत केली जाईल.

३) व्हिसा मुलाखत १५ जून ते १० जुलै दरम्यान होण्याची शक्यता आहे. व्हिसा मंजूर झाल्यावर एक आठवड्याच्या आत उर्वरित सर्व रक्कम भरावी लागेल.

४) ज्यांच्याकडे अमेरिकेचा USA व्हिसा आहे त्यांना नोंदणी करताना रु. ५०,०००/- रु भरावे लागतील. उरलेली रक्कम १५ जुलै २०२२ पूर्वी भरावी लागेल. 

५) मर्यादित जागा आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर नोंदणी सुरू आहेत. 

६) खालील लिंकवरून ऑनलाईन नोंदणी करता येईल. तसेच गुगल पे वरूनही नोंदणी करता येईल. 

७) डेलिगेशनमध्ये नाव नोंदवण्यासाठी अखेरची तारीख : १५ जून, २०२२ 

 

  • बँक खात्याची माहिती: 

बँक खात्याचे नाव : विश्व मराठी फाऊंडेशन 

बँकेचे नाव व शाखा : बँक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना, पुणे 

चालू खाते क्रमांक : ६०३२४५०३८२८ 

IFS Code : MAHB0000003   

  • USA व्हिसा साठी विशेष सहाय्य उपलब्ध केले आहे.

  • तीन किंवा अधिक जणांच्या ग्रुपसाठी थोडी सवलत देता येईल.

  • व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी : 
    English - Download 

        मराठी - डाउनलोड करा 

संपर्क :

सौ. स्वाती यादव - 9673998600

प्रा. अनिकेत पाटील - 7507207645

​ऑनलाईन नोंदणी अर्ज भरा 

bottom of page