Vishwa Marathi Parishad

Mar 7, 20211 min

सुखाचा मंत्र

कोणाशीही स्पर्धा नाही, कोणाशी तुलना नाही

मग आनंदाला तोटा नाही

कोणाचाही राग नाही

काल बोललेले आज लक्षात नाही

कधी स्वतःचेच गायन ऐकतो

कधी कागदावर चित्र रंगवतो

मीच परीक्षक मीच कलाकार

मग मी नेहमीच खुश राहणार

कधी झाडावर सुंदर पक्षी पाहतो

कधी झऱ्याचे गीत ऐकतो

फुलांचे थवे मजेत पाहतो

पायवाट माझी मीच शोधतो

मित्र भेटता पहिले नमस्कार मीच करतो

त्यांच्याशी हितगुज करत रमतो

मुलांनाही हाय करतो

रमतगमत घरी परततो

बिछान्यावर शांत जेव्हा पडतो

मनाने विधात्याचे अस्तित्व मानतो

त्याला तरीही काही न मागतो

फक्त सुखी जीवनाचे आभार मानतो

दीपक दत्तात्रय भालेराव

आर्यावर्त ,नाशिक

सेल न 9869332169

Email ddbhalerao1@gmail.com

    5772
    18