Vishwa Marathi Parishad

Apr 6, 20212 min

||थोडा मागोवा...||

मागील वर्षीच्या चोविस मार्च पासुन प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रकारची अनिश्चितता येऊन बसलेली आहे.गेलेल्या वर्षाचा आढावा घेतल्यास जनता कर्फ्यू, लाॅकडाऊन,सोशल डिस्टंसिंग,मुखपट्टी(मास्क), सॅनिटायजर आणि कोविड-19... कोरोना हे शब्द व यांची परिपूर्ण व्याख्या देशातील तमाम जनतेच्या ओठी आरोग्याच्या सर्वांग जाणीवेसह आवश्यकता होऊन बसल्यात.


 
आपण व आपलं आयुष्य खुप सोप्पं असतं असं मानताना मानव,मानवाचे भावतरंग,जगण्याची अभिप्रेत असलेली जीवनमुल्यं आणि कागदांचे अर्थ हे किती क्षणभंगुर असतात हे सुध्दा सरते वर्ष बिनबोभाटपणे शिकवुन गेलाय... नव्हे आजही शिकवतोय.
 
मानवा पोटी असलेल्या इतर कुठल्याही व कसल्याही महत्वाच्या आवश्यकते पेक्षा 'आरोग्यम् धनसंपदा' हेच सर्वार्थाने श्रेष्ठ धन हे कोरून गेलाय.
 
दरम्यान आपलं एकटेपण... आपली स्वतः प्रति स्वच्छता हिच खरी संपत्ती... संपन्न आरोग्य दुतं असल्याचे सांगुन ठेवलंय.


 
खरं म्हणजे काही नैसर्गिक नियमावली पालन करायलाच हवी. नाहीतर काळात काय लिहून ठेवलंय जाणून घेण्याएवढं मानवी ज्ञानात भर पडलेली नाही.आणि हो बरं का ज्ञानाशिवाय कुठलीही भक्ती अंध असते, या ज्ञानी भक्ती वर विश्वास नाही ठेवला तर नियमित होणारे जे काही कर्म (यात मानवता,माणुसकी, सचोटी, सोज्वळता,अभिप्रेत ) आहेत ते नुसते डोळस असुनही अंध असतात. म्हणूनच हे ज्ञान... भक्ती... व कर्म सध्या अद्दातद्दा पध्दतीने होत आहेत .... नव्हे यापुढे असे म्हणेन की असे निव्वळ बेफिकीर जगणे आंधळे आहे. जे केलंय ते इथेच फेडावे ही अध्यात्मिक जाणीव दृढ होऊ पाहते आहे हे ही खरंय. काळ सोकतो एवढं मात्र वाटतंय.
 
मानव... सभोवतालचा निसर्ग.... एकमेकां प्रति सकारात्मक भावना... संभावित अंतर.. या गोष्टी जपणे आणि याच मानवी मूल्यांची जपणुक करणे हेच अंतिम ध्येय.... कदाचित या सरत्या वर्षाने सांगितले तर नसावे...?
 
अशा या अविवेकी वागणुकीत वर्तमानच नाही तर आपला भुत व भविष्याला सुध्दा आपणच असमाधानाच्या पायरीवर नेऊन ठेवले. या अनिश्चिततेला यापुढे सोबतच घ्यावे लागेल, अशा गढुळ वातावरणाला पुढील काळात सर्वांनाच थोडं-थोडं शुध्द करावं लागेल.


 
असो,


 
बस अगले मोड़ सुकून होगा...
 
चल जिंदगी, थोड़ा और चलें...!!
 
असे म्हणताना,सोबत राहताना सौहार्दपूर्ण वातावरण ठेवुयात.आपली वागणुकी किल्मिषे झटकून नव्या सकारी जोमाने वागुयात.सर्वांगीण करूणा,सर्वांपर्यंत काळजीचे पांघरून घेऊयात. हिच प्रयत्नांची कास सोडु नये या मताशी ठाम राहूयात.


 
बाकी,वर्ष चिंतनात व भावी वागणुकीत काळ योग्य तेच उत्तर देईल.


 
©️®️दीपा..
 
दीपक मा. पाठक (दीपा)
 
9822523995
 
Email.: dipak111267@gmail.com

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

    2121
    3