विश्व मराठी परिषद

Jul 14, 20201 min

संस्कृती

दाराच्या चौकटीवरची तिची जागा

फिरुन मात्र गाव येते...

परंपरेच्या नावाने मागे खेचत बसते

सुधारणा दिसली तरी तोंड फिरवते..

जाती धर्म आडवे करुन अडकवुन ठेवते

घराण्याच्या प्रथा म्हणुन मनाविरुद्ध वागवते...

बंधनाची साखळी पायात बांधुन ठेवते

तोडावी वाटली तरी डोळ्यांसमोर कुटुंब आणुन ठेवते...

कधी कपड्यांमधुन तर कधी वाचे मधुन दिसते

प्रत्येकाला मात्र अलगद तालावर नाचवते...

घराण्याचा वारस म्हणुन मुलाला पुढे ढकलते

मुलगी परक्यांची होणार म्हणुन पुढे गेली तरी तिला मागेच खेचते....

आजचा काळ क्षणात विसरायला लावते 

रुढी परंपरा म्हणुन तो-यात फिरते...

कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

वृषाली अर्जुन गायकवाड (रायगड)

मो: 8308782361

ईमेल: vrushigaikwad1997@gmail.com


नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

    1010
    3